Uncategorized

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व राजकुमार पाटील यांच्या उपस्थितीत बोरगाव येथे रोझा इफ्तार पार्टी संपन्न होणार.

माळशिरस तालुक्यात कार्यतत्पर पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माळशिरस तालुका दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे…

बोरगाव (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, भाजपचे प्रांतिक सदस्य व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी विशेष निमंत्रित संचालक राजकुमार पाटील उर्फ नाना यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यातील बोरगाव येथे मुस्लिम समाज बांधवांसमवेत रोझा इफ्तार पार्टी शुक्रवार दि. २१/४/२०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे. माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माळशिरस तालुका दौऱ्याकडे विशेष लक्ष लागून राहिलेले आहे.

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार यांचे माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या वेळी मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. आश्वासनातील माळशिरस तालुक्यातील इंग्रज कालीन फलटण-पंढरपूर रेल्वे, निरा-देवधर प्रकल्पातील रखडलेला कॅनॉलचा प्रश्न, माळशिरस तालुक्यात अनेक दिवसापासून एमआयडीसीची मागणी आहे, योगायोगाने म्हसवड कॉरिडॉरमध्ये माळशिरस तालुक्यातील गारवाड गावाचा समाविष्ट करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा करून पत्र दिलेले आहे.

पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर जनतेच्या मनातील कामे करून देत असल्याने तालुका दौऱ्याकडे विशेष लक्ष लागून राहिलेले आहे. योगायोगाने अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ सकाळी होत आहे. आणि सायंकाळी माळशिरस तालुक्यात खासदार येत आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. Po wyłączeniu większości telefonów komórkowych zniesione zostanie ograniczenie dotyczące wprowadzania nieprawidłowego hasła.W tym momencie można wejść do systemu poprzez odcisk palca, rozpoznawanie twarzy itp.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort