गाथामूर्ती ह.भ.प. श्री. रामभाऊ महाराज राऊत यांचे मळोली ता. माळशिरस येथे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन केलेले आहे.
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज श्री गुरु देहुकर फडाचे जेष्ठ अधिकारी वैकुंठवाशी श्री गुरु मधुसूदन महाराज देहूकर आण्णा यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मळोली ( बारामती झटका )
सद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे नववे वंशज श्री गुरु देहुकर फडाचे जेष्ठ अधिकारी वैकुंठवाशी श्रीगुरु मधुसूदन महाराज देहूकर उर्फ अण्णा यांच्या साहव्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार दि. 01/09/2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत गाथामूर्ती ह.भ.प. श्री. रामभाऊ महाराज राऊत यांचे सुश्राव्य कीर्तन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देहूकर फड व समस्त देहुकर परिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.



सद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे आठवे वंशज गुरुवर्य ह.भ.प. जयराम महाराज देहूकर यांनी मळोली व पंचक्रोशीतील लोकांना भागवत सांप्रदायाची आवड निर्माण केलेली होती. मळोली गावातील तत्कालीन लोकांनी शंभर एकर जमीन जयराम महाराज यांना दिलेली होती. जयराम महाराज यांचा वसा आणि वारसा आठवे वंशज ज्ञानेश्वर महाराज, नववे वंशज गुरुवर्य मधुसूदन महाराज देहूकर यांचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवला. दहावे वंशज ह.भ.प. बापूसाहेब देहुकर महाराज यांनी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पद भूषविलेले आहे. त्यांचे चिरंजीव ह.भ.प. सोहम महाराज देहूकर हे सुद्धा देहूकर विचारांचा वारसा पुढे नेत आहेत. सर्वांनी पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन ह.भ.प. बापूसाहेब महाराज, ह.भ.प. नंदकुमार महाराज, ह.भ.प. सोहम महाराज यांच्यावतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

