गिरझणी येथे होलार समाज यंग ब्रिगेड संघटनेचे उद्घाटन उत्साहात संपन्न.
अकलूज (बारामती झटका)
गिरझणी ता. माळशिरस येथे होलार समाज यंग ब्रिगेड संघटनेचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. होलार समाज यंग ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष बाॅस दादासाहेब नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेची माळशिरस तालुक्यातील दुसरी शाखा असून शनिवार दि. ०१/१०/२०२२ रोजी सायंकाळी या शाखेचे उद्घाटन होलार समाजाचे महाराष्ट्र राज्याचे नेते तानाजीराव भडंगे, राज्याचे नेते दत्ताभाऊ ढोबळे, होलार समाज यंग ब्रिगेड युवती तालुका अध्यक्ष जयश्रीताई बिरलिंगे तसेच रिपाइं माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सतिश पालकर, बहुजन नेते विकासदादा धाईंजे, राष्ट्रवादीचे नेते किरण साठे, रिपाइंचे समाधान भोसले, भोजराज तात्या माने, गिरझणीचे उपसरपंच मयूर माने, विजय माने, सागर देशमुख, सागर पालकर, शंकर चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आलेल्या मान्यवरांनी चळवळीच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे, असे सांगून स्वाभिमानाने होलार समाज यंग ब्रिगेड कार्यरत आहे व भविष्यातही कार्यरत राहिल अशी आशा व्यक्त केली. यावेळी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या फोटोचे पुजन करण्यात आले व संयोजकांच्या वतीने त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात युवती तालुका अध्यक्ष जयश्रीताई बिरलिंगे यांची होलार समाज यंग ब्रिगेड युवती सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी तसेच पंढरपूर तालुकाध्यक्ष पदी बिरुदेव केंगार यांची निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमास होलार समाज यंग ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अभिजीतदादा केंगार, तालुका कार्याध्यक्ष सागर पारसे, तालुका सचिव दादासाहेब करडे, तालुका संपर्कप्रमुख डॉ. राहुल केंगार, तालुका सहसचिव सचिन हेगडे सर, तालुका उपाध्यक्ष गोविंद ऐवळे, पराग भाई गोरे, संभाजी तोरणे, संजय होनमाने, खजिनदार दादा ऐवळे, महाराष्ट्र प्रवक्ते अनिल जावीर, संरक्षक प्रमुख दत्ता होनमाने, सदस्य नाथा पारसे, बिरुदेव ऐवळे, सागर ऐवळे आदी उपस्थित होते.
तरी सदर कार्यक्रमास निमंत्रक मच्छिंद्र हेगडे (शाखाध्यक्ष), संतोष हेगडे (उपाध्यक्ष), अतुल हेगडे (खजिनदार), सुनील हेगडे (सचिव), अमर हेगडे (कार्याध्यक्ष), तुकाराम हेगडे (सहसचिव), गोरख हेगडे (संघटक), जालिंदर केंगार (सह संघटक), ज्येष्ठ नेते बापू ऐवळे, भीमा ऐवळे, भागवत हेगडे, बाळू हेगडे, अजिनाथ हेगडे, मारुती हेगडे, सदस्य देविदास ऐवळे, बापू होनमाने, अंकुश हेगडे, लखन होनमाने, चैतन्य हेगडे, अभिजीत होनमाने, दत्तात्रेय ऐवळे, समीर ऐवळे, धनाजी हेगडे, भीमराव जावीर, तुकाराम ढोबळे, तानाजी हेगडे तसेच माळशिरस तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे नेते व तालुक्यातील होलार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng