Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

गोरख जानकर यांच्यावतीने ज्ञानसेतू करिअर मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेस मल्टिपर्पज मशीन देणगी स्वरुपात भेट

तरंगफळ (बारामती झटका)

तरंगफळ ता. माळशिरस येथील रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय सेवाभावी दिव्यांग संस्थेचे तालुकाअध्यक्ष गोरख मारुती जानकर यांनी स्व. मारुती जानकर यांच्या स्मरणार्थ आणि तरंगफळच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या जगुबाई जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानसेतू करिअर मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेस मल्टिपर्पज मशीन देणगी स्वरुपात भेट दिली आहे. त्यांच्या या स्तुत्य कार्यामुळे अभासिकेतील अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

यामध्ये स्कॅनर/प्रिंटर/झेरॉक्स अशा प्रकारचे १२,५०० रू. किंमतीचे मल्टिपर्पज मशीन आहे. माळशिरस तालुक्यामधील अनेक अधिकाऱ्यांनी एकत्र येवून ज्ञानसेतु करिअर मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका सुरु केलेली आहे. या उपक्रमामध्ये खारीची मदत व्हावी, हा उदात्त हेतू ठेवून गोरख जानकर यांनी स्वर्गीय वडिलांच्या स्मरणार्थ आणि आईच्या साक्षीने ही मदत केली आहे. गोरख जानकर यांचा सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग असतो. दिव्यांग बांधवांच्या विविध गरजांसाठी ते सतत प्रयत्नशील असतात.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button