गोरडवाडी येथील श्री बिरोबा मंदिर पांढरे देऊळ येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा संपन्न होणार..
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे.
गोरडवाडी (बारामती झटका)
गोरडवाडी ता. माळशिरस, येथील श्री बिरोबा मंदिर पांढरे देऊळ माळशिरस-म्हसवड रोड येथे श्री बिरोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते सोमवार दि. 29/05/2023 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे. त्यानिमित्त दुपारी 01 ते 04 वाजेपर्यंत गजी ढोल कार्यक्रम, महाभोजन दुपारी 03 ते 05 या वेळेमध्ये होणार आहे. तरी गोरडवाडी पंचक्रोशीतील सर्व भाविकभक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहून श्री बिरोबा देवाचा कृपाशीर्वाद घ्यावा, असे समस्त गोरडवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे.
गोरडवाडी येथे श्री बिरोबा देवाची तीन ठिकाणी प्रमुख स्थाने आहेत. बनामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. गोरडवाडी गावातील सर्व लहानथोर मंडळी ग्रामदैवत श्री बिरोबा देवाची मनोभावे सेवा करीत असतात. गोरडवाडी हद्दीमध्येच श्री बिरोबा मंदिर पांढरे देऊळ म्हसवड-माळशिरस रोडवर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारले होते. माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याकडे श्री बिरोबा भक्तांनी सभा मंडपाची मागणी केलेली होती. त्याप्रमाणे लोकप्रिय दमदार आमदार यांनी सभा मंडपासाठी निधी मंजूर केलेला होता. सदरची जागा सभामंडपासाठी अडचणीची ठरत असल्याने गोरडवाडीचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच लक्ष्मण तात्या गोरड यांनी दोन गुंठे स्वतःची जागा बक्षीस पत्र करून दिल्यानंतर सदरच्या जागेवर भव्य आणि दिव्य सभा मंडप उभा राहिलेला आहे.
गोरडवाडी गावातील शाखा अभियंता श्री. गोविंद कर्णवर पाटील योगायोगाने अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत आहेत. त्यांनी डिझाईन जागेला व मंदिराला शोभेल अशा पद्धतीने बनवलेली आहे. म्हसवड-माळशिरस रोडवरून प्रवास करणारे अनेक लोक आकर्षक सभामंडप व श्री बिरोबा मंदिर पांढरे देऊळ याचा कळस पाहत आहेत. अशा सुसज्ज व आकर्षक श्री बिरोबा मंदिर पांढरे देऊळ येथे श्री बिरोबा मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. तरी सर्व बिरोबा भक्तांनी वेळेवर सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त गोरडवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This article had me hooked! For those curious, here’s more: DISCOVER MORE. What are your thoughts?