Uncategorizedताज्या बातम्या

गोरडवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

गोरडवाडी (बारामती झटका)

गोरडवाडी ता. माळशिरस येथे पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन अहिल्या प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ गोरडवाडी यांच्यावतीने दि. १०/६/२०२३ रोजी सायंकाळी ५ वा. गोरडवाडी येथे करण्यात आले आहे. तसेच रविवार दि. ११/६/२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता डान्स स्पर्धेचे बक्षीस वितरण, नूतन एमपीएससी व पोलीस अधिकारी आणि इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माजी आमदार ॲड. आर. जी. आप्पा रुपनवर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. तसेच यावेळी गजी ढोल कार्यक्रम व डीजे भव्य मिरवणूक सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये ग्रुप डान्स व सोलो डान्स अशा स्पर्धा असणार आहेत. ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे ७७७७/- रुपयांचे बक्षीस आप्पा गोरड सर, सरपंच पांडुरंग तात्या पिसे, माजी चेअरमन खंडू तात्या कळसुले यांच्या वतीने देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाचे ५५५५ रुपयांचे बक्षीस माजी सरपंच भागवत कर्णवर पाटील, भरत गोरड सर, माजी चेअरमन संतोष गोरड यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तर तृतीय क्रमांकाचे’३३३३ रुपयांचे बक्षीस युवा उद्योजक महादेव यमगर, बिरोबा हार्डवेअरचे तानाजी गोरड आणि अहिल्यादेवी कृषी केंद्राचे शिवाजी गोरड यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

सोलो डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे ५५५५ रुपयांचे बक्षीस समीर गोरड, चि. देवेन गाढवे, चि. विष्णू हुलगे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच द्वितीय क्रमांकाचे ३३३३ रुपयांचे बक्षीस माजी उपसरपंच दीपक आबा गोरड, युवा नेते आबा गोरड, चैतन्य कोकरे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तर तृतीय क्रमांकाचे २२२२ रुपयांचे बक्षीस रामभाऊ गाढवे, युवराज यमगर आणि गोपीनाथ गोरड यांच्या वतीने देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ८८०६५८६५७८, ७०५७९९४९७६, ७७५६०५९५१४ नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या डान्स स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अहिल्या प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ गोरडवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort