गोरडवाडी येथे शिक्षक मित्र ग्रुपच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न
प्रसंगावधानाने मदत करणाऱ्या सुरेश गोरड यांचा शौर्याबद्दल विशेष सन्मान
गोरडवाडी (बारामती झटका)
गोरडवाडी ता. माळशिरस येथील शिक्षकमित्र ग्रुपच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा संपन्न झालेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलिस म्हणून निवड झालेले अमोल नरळे, आशा खांडेकर, यांचा यश संपादन केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन शामराव हुलगे, व्हाईस चेअरमन सुनिल पोरे यांचाही निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. माळशिरस म्हसवड रोड, तीन मोरी नजिक मोटारसायकलचा भीषण अपघात झाला होता. त्यावेळी स्वत:चा जीव धोक्यात घालून अपघातग्रस्तांना प्रसंगावधान राखून सुरेश गोरड यांनी मदत केली. त्यामुळे अपघातग्रस्ताचा जीव वाचला. त्यांचा या शौर्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात जिद्द, चिकाटी व परिश्रम घेतल्यास यशाला गवसणी घालता येते. प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्वच क्षेत्रात प्रगती करीत आहेत, याचा अभिमान आम्हा सर्वांना आहे. केलेल्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करून प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रा. दादासाहेब हुलगे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकाश जाधव यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.भारत गोरड, जगन्नाथ गोरड, प्रकाश जाधव, तायाप्पा गोरड, शाखा अभियंता गोविंद कर्णवर-पाटील, आबासाहेब पिंगळे, युवा सरपंच विष्णुभाऊ गोरड, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष संजयजी हुलगे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng