गोरडवाडी येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य ह.भ.प. अनिल तुपे, महाराज नाशिक यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे
गोरडवाडीचे पहिले बिनविरोध सरपंच स्व. निवृत्ती गोरड उर्फ दादा यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
गोरडवाडी ( बारामती झटका)
गोरडवाडी ता. माळशिरस या गावचे पहिले बिनविरोध सरपंच निवृत्ती शंकर गोरड उर्फ दादा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार दि. 30/10/2022 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार गायनाचार्य ह.भ.प. अनिल तुपे महाराज नाशिक यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. कीर्तनानंतर पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी मित्रपरिवार, नातेवाईक व समस्त ग्रामस्थ यांनी वेळेवर कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीमती रखमाबाई निवृत्ती गोरड, सौ. शोभा व श्री. नाना निवृत्ती गोरड, सौ. उज्वला व श्री. गोदबा निवृत्ती गोरड, सौ. वैशाली व श्री. विजय निवृत्ती गोरड, सौ. अनुसया उत्तमराव कर्णवर पाटील गोरडवाडी, सौ. संगीता दत्तात्रय पिसे गोरडवाडी, सौ. सविता संजय गडदे पळशी यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
स्वर्गीय निवृत्ती शंकर गोरड उर्फ दादा यांना गोरडवाडी ग्रामपंचायतीत 1978 साली बिनविरोध सरपंच होण्याचा बहुमान मिळालेला होता. पूर्वीच्याकाळी इस्लामपूर, गोरडवाडी ग्रामपंचायत संयुक्त होती. गोरडवाडी विभक्त ग्रामपंचायत झाल्यानंतर पहिल्यांदा सरपंच पदाची धुरा दादांनी सांभाळलेली आहे. गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन स्वर्गीय माणिकराव कर्णवर पाटील यांच्या कार्यकाळामध्ये सलग 25 वर्ष संचालक म्हणून दादांनी काम पाहिलेले आहे. 1994 साली पुन्हा गोरडवाडी ग्रामपंचायतीत सरपंच झालेले होते. गोरडवाडी गावच्या जडणघडणीमध्ये दादांचा सिंहाचा वाटा आहे. गोरडवाडी गावाला अनेक विकासकामे आणून गावाचा चेहरा मोहरा बदललेला होता. ग्रामदैवत बिरोबा मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये दादांचा सिंहाचा वाटा होता.
दादांच्या पश्चात मुलगा विजय गोरड यांना बिनविरोध सरपंच पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. चाळीस वर्षांपूर्वी वडिलांनी बिनविरोध सरपंच पदाचा कार्यभार सांभाळलेला होता. त्यांच्या पश्चात मुलगा सुद्धा बिनविरोध सरपंच झालेला आहे. दोन वर्षांपूर्वी दादांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झालेला होता.
गोरड परिवार यांनी द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसाद कार्यक्रमास मित्रपरिवार व नातेवाईक समस्त ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे, असे गोरडवाडी गावचे बिनविरोध सरपंच विजयराव गोरड आणि समस्त गोरड परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng