Uncategorizedताज्या बातम्या

गोरडवाडी येथे ह.भ.प. संजीवनीताई शिंगाडे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. सजाबाई मल्हारी कर्णवर पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप

गोरडवाडी (बारामती झटका)

गोरडवाडी ता. माळशिरस येथे कैलासवासी सजाबाई मल्हारी कर्णवर पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त युवा कीर्तनकार ह.भ.प. संजीवनीताई शिंगाडे, नातेपुते यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन रविवार दि. १२/३/२०२२ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत गोरडवाडी, बाळूमामा मंदिर येथे होणार आहे‌. तसेच सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप देखील करण्यात येणार आहे.

गोरडवाडी गावचे माजी पोलीस पाटील मल्हारी कर्णवर पाटील यांच्या धर्मपत्नी कै. सजाबाई यांचे पाच वर्षापूर्वी दुःखद निधन झालेले होते. कर्णवर पाटील परिवारामध्ये सजाबाई यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. त्यांनी केलेले कार्य समाजाला आदर्शवत आहे. त्यांचा वसा आणि वारसा भागवत, शशिकांत, गोविंद हे चालवत आहेत. त्यांच्या पश्चात एकत्र कुटुंब पद्धती हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button