Uncategorizedताज्या बातम्या

ग्रामसेवक संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी श्री. विजयसिंह देशमुख उर्फ एम.डी. देशमुख यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड…

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक यूनियन डीएनई – 136 तालुका शाखा माळशिरस येथील पंचवार्षिक निवडणूक 2023-28

माळशिरस (बारामती झटका)

राज्य संघटनेच्या आदेशाने नियुक्त केलेले श्री. सखाराम काशिद निरीक्षक तथा मराठवाडा विभागीय सहसचिव महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक यूनियन डीएनई 136, सोलापूर जिल्हा संघटनेने नियुक्त केलेले श्री. गोपाळ मुरलीधर सुरवसे निवडणूक निर्णय अधिकारी, श्री. समाधान शत्रुघ्न घुगे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व श्री. प्रविण तेलप संचालक, बीड जिल्हा ग्रामसेवक पतसंस्था यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक यूनियन डीएनई – 136 तालुका शाखा माळशिरसची बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली. कृषी पदवीधर असलेले अध्यक्ष श्री. विजयसिंह देशमुख उर्फ एम.डी. देशमुख, ग्रामविकास अधिकारी यांची सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. श्री. विजयसिंह देशमुख यांचा दांडगा जनसंपर्क, प्रशासन व पदाधिकारी यांच्याशी उत्तम समन्वय राखून गेली 5 वर्ष संवर्ग बंधुसाठी चांगले काम तसेच अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून सर्वत्र परिचय आहे. संवर्गासाठी केलेल्या चांगल्या कामाची पोहोचपावती सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करून मिळाली आहे.

कार्यकारिणी निवडताना पूर्व भाग, पश्चिम भाग व सामाजीक समतोल राखन्याचा प्रयत्न व सर्वांना समान संधी देण्यात आली आहे. यामध्ये खालीलप्रमाणे कार्यकारी मंडळ बिनविरोध निवड झाले आहेत…
1) श्री. विजयसिंह शंकरराव माने-देशमुख – अध्यक्ष
2) श्री. राहुल पांडुरंग म्हसवडे – सचिव
3) श्री. विजयकुमार पोपट नवले – उपाध्यक्ष
4) श्रीमती अर्चना नारायण केमकर – महिला उपाध्यक्ष
5) श्री. संतोष मल्हारी पानसरे- कार्याध्यक्ष
6 )श्री. सचिन गोपाळ बनकर – कोषाध्यक्ष
7) श्री. उमरफारूक सलमाउद्दीन कोरबु – सहसचिव
8) श्रीमती आश्वीनी योगीनाथ सावंत – महिला संघटक
9) श्री. आप्पा यशवंत होळ – संघटक

अगदी खेळीमेळीच्या वातावरणात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक यूनियन डीएनई 136 तालुका शाखा माळशिरस जि. सोलापूर च्या नुतन कार्यकारणीची निवड प्रक्रिया पार पडली आहे. माळशिरस तालुका संघटनेचे नुतन अध्यक्ष, सचिव व सर्व नुतन सन्मानीय पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सदर निवडीसाठी संघटनेचे जिल्ह्य उपाध्यक्ष श्री. डी. के. गोरे, कार्याध्यक्ष श्री. प्रदीप काळे, श्री. सोमनाथ होळ, श्री. सुधाकर मुंगूस्कर, श्री. पी. एम. ठवरे, श्री. उरवणे, श्री. विलास बाबर, श्री. दत्ता नाले, सौ. भापकर, सौ. अनिता शिंदे, सौ. करंजकर मॅडम, सौ. दीक्षित मॅडम व सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button