Uncategorized

ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला चांगली सेवा देऊन बरे होण्याचा आत्मविश्वास निर्माण करा – शिवाजीराव सावंत

नातेपुते (बारामती झटका)

ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सेवा देऊन बरे होण्याचा आत्मविश्वास निर्माण करा. आरोग्यमंत्र्यांनी रुग्णसेवेबाबतचा घेतलेला संकल्प तडीस नेण्याचे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांनी नातेपुते ग्रामीण रुग्णालयात तात्काळी मंजुरी देऊन कार्यान्वित केलेल्या रुग्णांसाठी अति महत्त्वाच्या असणाऱ्या रक्ताच्या ॲटोॲनालयझर व अत्याधुनिक तपासणी यंत्राच्या लोकार्पण कार्यक्रमात व्यक्त केले.

पुढे बोलताना शिवाजीराव सावंत म्हणाले, माणसाला कोरोनामध्ये आरोग्याचे महत्त्व कळाले. आरोग्याच्या सुविधा मिळवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांकडे जे खातं आलं त्यांनी ते सर्वसामान्य, गोरगरीब समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचली पाहिजे, असा त्यांचा जो मानस आहे त्याला साजेसं काम प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्स स्टाफ या सर्वांनी केलं पाहिजे. सुरक्षित माता सुरक्षित घर या अभियानातून जवळपास सहा कोटी महिलांची तपासणी महाराष्ट्रात करण्यात आली. आणि महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आरोग्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील पद्धतीने काम करणारे ठरलं. ग्रामीण भागात आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा कानमंत्र आम्हाला त्यांनी सेनेत असताना दिला होता आणि बाळासाहेबांचे शिवसेना ही याच विचाराच्या धारेवर काम करत असून सरकार मधला झालेला प्रत्येक निर्णय ही गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार, व्यावसायिक यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल, असा विश्वास त्यांनी दिला.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय पाटील म्हणाले, आज माझा सोलापूर जिल्ह्याचा पदभार घेतल्याचा पहिला दिवस आहे. साहेबांचा फोन आला आणि मी ते टाळू शकलो नाही आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला अभिवादन करण्याचा मान मला नातेपुते ग्रामीण रुग्णालयात मिळाला. कारण याच रुग्णालयात आरोग्यमंत्र्यांनी पदभार घेतल्यादिवशी पहिला दौरा नातेपुतेमधूनच चालू केला होता. या ठिकाणी ज्या उणीव आहेत, त्या निश्चितपणाने भरून काढण्याची जबाबदारी मी घेईन व नातेपुते ग्रामीण रुग्णालयासाठी बालरोग तज्ञ देऊन एक मोठी पोकळी भरून काढण्याचे काम माझ्या लेव्हलला मी करेल.

यावेळी माळशिरस तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले, आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सुद्धा जयंती आहे. दोघेही महान विचारवंत समाजाला, देशाला दिशा द्यायचं काम या विचाराने केले आहे. आणि दोघांच्या जयंतीच्या औचित्य साधून ॲटो ॲनालायझर व सेल काउंटर या मशीनचा लोकार्पण सोहळा माता सुरक्षित घर सुरक्षित या अभियानाचा दुसरा टप्प्याचे उद्घाटन व एक ते अठरा वयोगटातील मुलांची शारीरिक तपासणी हा आरोग्यमंत्र्यांचा अजय देवगनचा कार्यक्रम याची सुरुवात माळशिरस तालुक्यातून होत आहे याचा नितांत आदर आणि स्वाभिमान अभिमान आपल्या सर्वांना असला पाहिजे. कारण आपल्या या कामांमध्ये 38 जिल्ह्यांमधून माळशिरस तालुक्याचे नाव अग्रक्रमाने पुढे येतं. माळशिरस तालुक्यात आरोग्यमंत्र्यांचे विशेष लक्ष आहे आणि प्रत्येक योजनेसाठी सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब लक्ष ठेवून असतात त्यांच्याकडे कोणतेही काम सांगितले की ते झाल्याशिवाय राहत नाही आणि करून घेतल्याशिवाय मी राहत नाही, अशा भूमिकेत आम्ही दोघेही काम करत असतो. आणि आपण ॲटो ॲनालायझर मशीन नातेपुते ग्रामीण रुग्णालयात बसवल्यामुळे पूर्वी रक्ताचे नमुने किंवा अत्यंत गंभीर तपासणी रक्ताचे असेल तर पेशंटला पंढरपूर या ठिकाणी पाठवावे लागत होतं, हे यापुढे होणार नाही. प्रा. शिवाजीराव सावंत राज्याच्या आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या तात्काळ मंजुरीने आपण ही गोष्ट गोरगरीब जनतेसाठी उपलब्ध करून दिल्याने किडनी, फुफ्फुस, लिव्हर अशा 12 प्रकारच्या महागड्या टेस्ट आपण ग्रामीण रुग्णालयात मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे नातेपुते ग्रामीण रुग्णालयाच्या जवळपास पुणे जिल्हा, सातारा जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

सदर कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे उपमुख महावीर नाना देशमुख, पंढरपूर शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी बागल, जिल्ह्याचे उपप्रमुख दत्ता सावंत साहेब, अकलूजचे दीपक खंडागळे, जिल्हाप्रमुख ढेरे साहेब, डॉ. एम. पी. मोरे, डॉ. नम्रता होरा, डॉ. गुडे साहेब, डॉ. सातव साहेब, दादा मुलाणी, जावेद मुलाणी, पोपराव शिंदे, अक्षय लांडगे, आकाश साबळे, सुनील गोरे, राहुल वाघमोडे, विशाल वाघमोडे, रणजीत वाघमोडे, संदेश बरडकर, मनोज जाधव, भैय्या चांगण आदींसह भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button