Uncategorizedताज्या बातम्या

घाडगे व शेळके परिवाराने महिलांना प्रोत्साहन देण्याचे केलेले कार्य कौतुकास्पद – धैर्यशील मोहिते पाटील

माळेवाडी येथे मंगलमूर्ती मिसळचा शुभारंभ.

अकलूज (बारामती झटका)

महिला सामाजिक शैक्षणिक तसेच संरक्षण क्षेत्रातही उत्तम कामगिरी करीत आहेत.त्याचप्रमाणे व्यवसायातही उत्तम कामगिरी करू शकतात. फक्त त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असून, तेच कार्य घाडगे, शेळके परिवाराने केले आहे. मंगलमूर्ती मिसळ ही संपूर्ण महिला चालवणार असल्याचे पाहून आनंद वाटला असल्याचे मत भाजप संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.

अकलूजचे ग्रामदैवत अकलाई देवी च्या कृपा आशीर्वादाने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकलूज नगरीत अकलाई उद्योग समूहाच्यावतीने अकलूज-वेळापूर रोडवर माळेवाडी येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या घाडगे व शेळके कुटुंब यांच्या मंगलमूर्ती मिसळ या व्यवसायाचे उदघाटन भाजपाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस, शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी मंगलमूर्ती मिसळचे संस्थापक शंभूराजे निकम, प्रवीण माने, उद्योजक हेमंत (बापू) टेके, अतुल बनकर, मंगलमूर्ती मिसळ माळेवाडी शाखा – 27चे ओनर राजेश घाडगे, बापू शेळके, सौ. पल्लवी घाडगे, सौ. रेश्मा शेळके आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात पुढे बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले की, नव्याने शुभारंभ झालेल्या मंगलमूर्ती मिसळच्या माध्यमातून अकलूज परिसरातील खवय्ये असलेल्या ग्राहकांसाठी एक नवीन दालन उभे राहिले असून, त्याचा फायदा अकलूजकरांना नक्कीच होणार आहे. तसेच चांगले, दर्जेदार उत्पादन मिळेल. शिवाय सर्व भगिनी मिळून हा व्यवसाय चालवीणार आहेत. अकलूज आणि परिसरात असे एकही दालन नाही. की जेथे 100% महिला व्यवसाय चालवीतात. हे पहिलेच दालन आहे. घाडगे आणि शेळके परिवार यांनी महिलांवर जो विश्वास दाखविला आहे. तो कौतुकास्पद आहे. असाच पुढाकार सर्व पुरुष मंडळींनी घ्यायला हवा. आज महिला सुद्धा कोणत्याही व्यवसायात कमी नाहीत. केवळ चूल आणि मूल यापुरत्याच महिला सिमीत नाहीत. तर व्यवसायातसुद्धा महिला पुढे येत आहेत. महिलांच्या पाठीमागे सर्वांनी भक्कमपणे उभे राहायला हवे. महिला पुरुषांपेक्षा चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतील, असे सांगत मोहिते पाटील परिवाराच्यावतीने शुभेच्छा देऊन महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट दिली.

सदर प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकार गणेश जाधव यांनी सांगितले की, घाडगे आणि शेळके कुटुंब यांनी एक नवीन पायंडा पाडला असून, आपल्या कुटूंबातील महिलांवर विश्वास दाखवून त्यांना व्यवसाय सुरु करून दिला आहे. या मिसळ हाऊसमध्ये केवळ महिलाच हा व्यवसाय चालविणार आहेत. तसेच मंगलमूर्ती मिसळच्या माध्यमातून आता येथेच उत्कृष्ट, चविष्ट, झणझणीत मिसळ खायला मिळणार असून अकलूज आणि परिसरातील खवय्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

यावेळी प्रास्ताविक मंगलमूर्ती मिसळचे संस्थापक शंभूराजे निकम यांनी केले. त्यांनी बोलताना सांगितले की, मंगलमूर्ती मिसळच्या आतापर्यंत 32 शाखा झाल्या असून, दिवसेंदिवस ग्राहकांचा विश्वास वाढत चालला आहे. ही मिसळ असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.

सदर प्रसंगी शुभेच्छा देताना उद्योजक हेमंत टेके यांनी सांगितले की, आपल्या भारतामध्ये असंख्य चविष्ट पदार्थ बनतात. आणि आपला महाराष्ट्र तिखट झणझणीत मसालेदार पदार्थासाठी ओळखला जातो. आजच्या दिवशी हे सांगण्याचे कारण हेच कि आज ज्या पदार्थाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलोय हा पदार्थ “मिसळ” हा फक्त आपल्या महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, तर संपूर्ण जगाला वेड लावणारा आवडीचा पदार्थ आहे. टेस्ट इटलास हि जगप्रसिद्ध संस्था जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थाची यादी जाहीर करते. याच संस्थेने आपल्या भारतातील ५० खाण्याच्या पदार्थाची सर्वोत्कृष्ट पदार्थ म्हणून निवड केली. आणि याच सर्वोत्कृष्ट पदार्थाच्या यादीत आपल्या महाराष्ट्रातील मिसळ या पदार्थाने ११ वे स्थान प्राप्त केले. आणि हाच सर्वोत्कृष्ट पदार्थ घेवून आपले सहकारी राजेश घाडगे व सौ. पल्लवी घाडगे, बापू शेळके व सौ. रेश्मा शेळके नवीन व्यवसाय “मंगलमुर्ती मिसळ” या नावाने सुरुवात करत आहेत. मिसळच्या नावात आपल्या हिंदू धर्मातील आद्य देवता श्री गणेशाचे नाव आहे, त्यामुळे मला नक्की खात्री आहे कि, या व्यवसायामुळे घाडगे व शेळके परिवाराचे तर मंगल होईलच पण जे खवय्ये मंगलमुर्ती मिसळचा आस्वाद घेतील त्यांचे देखील मंगल होईल. आजपासून आपण मंगलमुर्ती मिसळ या नवीन व्यवसायासह आपली स्वतःची नवीन ओळख तयार करणार आहात, मला तुमचा अभिमान आहे. अकलूजची मर्डर भजी, मोहितेचा स्पेशल चहा, लालू भाई चा वडा, जसे फेमस झाले तसे अकलुजमधील घाडगे यांची मंगलमुर्ती मिसळ फेमस व्हावी. असे म्हणत त्यांनी कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

मिसळ म्हणजे मिसळ म्हणजे मिसळ असते, पण एखादीच चवदार चीज मंगलमुर्ती मिसळ” असते मिसळ चे काय हो ? कोपऱ्या-कोपऱ्यावर मिळते, पण एखादीच वेगळी मल्टीग्रेन ‘मंगलमुर्ती मिसळ”असते. तर्रीबाज रांगडी मिसळ, इथून तिथून सगळीकडे दिसते पांढरी-तांबडी चवदार मात्र “मंगलमुर्ती मिसळ” असते. मराठी मिसळ ची कीर्ती पार साता समुद्रापार पोहोचते, तिथेही ड्राय फॉर्म मध्ये नाव मंगलमुर्ती मिसळ” चे असते.

याप्रसंगी माळेवाडीचे माजी सरपंच जालिंदर फुले, खंडाळीचे डॉ. प्रवीणसिंह पताळे, भजनदास बनकर, अकलूजचे कापड व्यापारी विलास भरते, सुनील टेके, यशवंतनगरचे प्रगतशील बागायतदार धिरज जाधव, सई केळी एक्सपोर् चे सचिन जाधव, बागायतदार अभिजित पताळे, पत्रकार गणेश जाधव, अकलूज येथील शहा एंटरप्रायजेसचे कमलेश शहा यांचेसह नातेवाईक मित्रमंडळी, बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन महादेव पवार यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. Great job on this article! It was engaging and informative, making complex ideas accessible. I’m eager to hear different viewpoints. Click on my nickname for more interesting content.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort