Uncategorized

चिलटे व डास मारायला रणगाडा किंवा तोफांची आवश्यकता नाही – जयसिंह मोहिते पाटील.

सहकारी सेवा सोसायटी मतदार संघात 1350 मते मिळतील तर ग्रामपंचायत मतदार संघात 400 चे लीड मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

मोहिते पाटील घराण्यापेक्षा संताजी धनाजी विरोधकांना पुरून उरतील – जयसिंह मोहिते पाटील

अकलूज (बारामती झटका)

चिलटे व डास मारायला रणगाडा किंवा तोफांची आवश्यकता नसल्याचे मत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांनी विरोधकांची खिल्ली उडवून मोहिते पाटील घराण्यापेक्षा आमचे कार्यकर्ते धनाजी संताजी सारखे पुरून उरतील, असा विश्वास व्यक्त करून सहकारी सेवा सोसायटी मतदारसंघात 1350 मते मिळतील तर ग्रामपंचायत मतदार संघात 400 चे लीड मिळणार असल्याचे सांगुन उत्तमराव जानकर यांचे नाव न घेता अनुसूचित जाती मतदारसंघात उभा राहण्यापेक्षा बाबाराजे देशमुख व मदनसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात उभे राहायला पाहिजे होता, असा टोला जयसिंह मोहिते पाटील यांनी लगावला आहे. तर खासदारांना एक लाखापेक्षा लीड देऊन कुठे आहेत दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असा सवाल उपस्थित केला.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त मा.श्री. विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ शिवरत्न बंगला येथे करण्यात आला. सुरुवातीस सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व राजमाता अक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळेस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशिल मोहिते पाटील, आ. राम सातपुते, अर्जुनसिंह मोहिते पाटील, बाबाराजे देशमुख, प्रकाश पाटील, प्रताप पाटील, मामासाहेब पांढरे, बी. वाय राऊत, संदीप पाटील, संग्रामसिंह जहागिरदार, माऊली पाटील, बाजीराव काटकर, लखन चव्हाण, पॅनलचे सर्व उमेदवार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदार व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह उमेदवार व नेते यांची भाषणे झाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button