चि. नितीन वगरे आणि चि.सौ.कां. ऋतुजा काळे यांचे जुळणार अतूट नाते
माळशिरस येथील श्री. जोतीराम आप्पा वगरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि विझोरी येथील श्री. अनिल हनमंत काळे यांची ज्येष्ठ सुकन्या यांचा शाही विवाह होणार संपन्न
माळशिरस (बारामती झटका)
कै. आप्पा विठोबा वगरे यांचा नातू व श्री. जोतीराम आप्पा वगरे रा. माळशिरस, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव नितीन आणि कै. हनमंत महादेव काळे यांची नात व श्री. अनिल हनमंत काळे रा. विझोरी, ता. माळशिरस यांची ज्येष्ठ सुकन्या यांचा शाही शुभविवाह सोहळा बुधवार दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी दु. १२ वा. ३२ मि. या शुभमुहूर्तावर श्री संत सावता माळी मंगल कार्यालय माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे. तरी सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी यांनी वधूवरांस अक्षतारूपी शुभ आशीर्वाद देण्यासाठी विवाह सोहळ्यात आग्रहाने उपस्थित राहावे.


तरी नजरचुकीने लग्नाच्या घाईगडबडीत आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून लग्नास उपस्थित राहण्याचे आवाहन वगरे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
