चि. प्रितम मुंगुसकर, वेळापूर व चि. सौ. कां. सानिका मोरे, बावी यांचा शाही शुभविवाह होणार संपन्न
श्री. राजाराम मुंगूसकर आणि श्री. प्रताप मोरे यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत जुळणार
वेळापूर (बारामती झटका)
कै. भागवत श्रीरंग मुंगुसकर यांचे नातू व सौ. मनीषा व श्री. राजाराम भागवत मुंगूसकर, रा. वेळापूर, ता. माळशिरस, यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रितम आणि श्री. हनुमंत दत्तू मोरे यांची नात व सौ. उज्वला व श्री. प्रताप हनुमंत मोरे, रा. बावी, ता. माढा यांची कन्या चि. सौ. कां. सानिका यांचा शाही शुभविवाह सोहळा मंगळवार दि. १३/६/२०२३ रोजी दुपारी १ वाजून ६ मिनिटे या शुभमुहूर्तावर इंद्रनील मंगल कार्यालय वेळापूर, पुणे-पंढरपूर रोड, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे. तरी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधूवरांस आशीर्वाद देण्याचे आवाहन श्री. राजाराम भागवत मुंगूसकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणास आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे अशी विनंती मुंगूसकर आणि मोरे परिवार यांच्यावतीने करण्यात आली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Very well written! The points discussed are highly relevant. For further exploration, I recommend visiting: LEARN MORE. Keen to hear everyone’s opinions!