Uncategorized

जय विजय सोप इंडस्ट्रीची प्रतिकूल परिस्थितीत यशाच्या शिखराकडे दैदिप्यमान वाटचाल सुरू…

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शुभारंभ केलेल्या उद्योग व्यवसायाच्या भरभराटीची यशोगाथा.

पिरळे ( बारामती झटका )

पिरळे ता. माळशिरस येथे नरूळे परिवार यांनी प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील व माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय विजय सोप इंडस्ट्रीचा तत्कालीन राज्यसभेचे खासदार व विद्यमान विधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते 2006 साली स्वतःच्या एस आर एन साबण व पावडरचा शुभारंभ केलेला होता. प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेला उद्योग व्यवसायाची यशाच्या शिखराकडे दैदीप्यमान वाटचाल सुरू आहे. आज उद्योग व्यवसायाची भरभराटी दिसत आहे. मात्र, त्यापाठीमागे नरुळे परिवारांची यशोगाथा मोठी खडतर आहे.

सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंब असणारे सौ. अलका रामलिंग नरूळे व श्री. रामलिंग किसन नरूळे यांचा शेती महामंडळामध्ये काबाडकष्ट करून उदरनिर्वाह सुरू होता. त्यांना संदीप, सुनील, सागर अशी तीन मुले आहेत. आई-वडिलांचा सुसंस्कृत स्वभाव व घरची गरीब परिस्थिती यामुळे लहानपणापासून ब्रह्म-विष्णू-महेश असे त्रिदेव असणाऱ्या बंधूंनी शिक्षण जीवनापासूनच गरीबीशी सामना करण्यास सुरुवात केलेली होती‌. संदीप नातेपुते येथे दहावी शिकत असताना टेलरिंगच्या दुकानांमध्ये काजी, बटन लावणे व इतर दुकानातील किरकोळ कामे करण्याचे काम करत होते. 1994 साली दहावी परीक्षेत नापास झाल्यानंतर त्यांनी शिक्षणाकडे पाठ फिरवली. लिहिता वाचता येत असल्याने व्यवहार ज्ञानाकडे आपला मोर्चा वळविला. लोणंद येथे बिस्किटे, साबण असा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. ते दुसऱ्याच्या कंपनीमधील माल घेऊन घरोघरी जाऊन विक्री करीत असत. त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नात उदरनिर्वाह सुरू होता. त्यानंतर अहमदनगर येथे 1999 साली भाडोत्री टेम्पो घेऊन नगर भागात दुसऱ्याचाच उत्पादित झालेला माल विक्री करण्यास सुरुवात केली. उद्योग व्यवसायामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या ओळखी होत गेल्या. पूर्वीच्या काळी गुणवत्ता व क्वालिटी उत्पादित मालाला राहत नसे. त्यामुळे एका गावांमध्ये साबण विक्री केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरे गाव घ्यावे लागत असे.

अशातच एका सुसंस्कृत अशा व्यापाऱ्याची भेट झाल्यावर त्यांनी स्वतःचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. मार्केटिंगचे व व्यवसायातील ज्ञान प्राप्त असल्याने पिरळे येथे जय विजय सुपर इंडस्ट्रीचा शुभारंभ तत्कालीन खा. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते 2006 साली सुरू केला. उद्योग व्यवसाय सुरू करीत असताना गरीब परिस्थिती आडवी आली. मात्र वालचंदनगर येथील बँक ऑफ इंडिया या बँकेने कर्ज देऊन सहकार्य केले. त्यामुळे उद्योग व्यवसायाला आर्थिक पाठबळ मिळाले. जय विजय सोप इंडस्ट्रीमध्ये एसआरएन पावडर व साबण मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जात आहे. दहा साबण व एक पावडर पुडा 100 रुपये किमतीला डोअर टू डोअर प्रत्येक गावामध्ये घरोघरी जाऊन मार्केटिंगचे काम सुरू आहे. स्वःताच्या विक्रीचे मार्केटिंग सुरू असून कोल्हापुर, इचलकरंजी, लोणंद अशा अनेक ठिकाणी डीलर्स नेमून त्यांना मालपुरवठा केला जातो.

सौ. अलकाताई व श्री. रामलिंग नरुळे यांनी गरीब परिस्थिती असताना सुद्धा आपल्या मुलांवर केलेले संस्कार यामुळे तिन्ही मुलांनी समाजामध्ये राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवून समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. मोहिते पाटील परिवार यांच्याशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहून राजकारणामध्ये नरूळे परिवार विश्वासाने समाजामध्ये काम करीत आहेत‌ संदीप नरूळे 2005 साली हिरडे गावचे उपसरपंच झालेले होते. सध्या सौ. अलकाताई रामलिंग नरूळे गावच्या विद्यमान सरपंच आहेत. गावामध्ये धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात नेहमी मोठा सहभाग असतो.

विजयदादा व बाळदादा यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने पिरळे गावामध्ये राजकारणातून जनतेची सेवा करण्याचे काम सुरू आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश असे त्रिमूर्ती असणारे संदीप, सुनील व सागर तिघांच्याही नावांमध्ये “स” असल्याने राजकारण असो समाजकारण असो किंवा धार्मिक कार्यक्रम असो तिघांचेही सरळ मार्गी वर्तणूक असते. तिघांचीही मुले शिक्षण घेत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत उद्योग व्यवसाय व राजकारण, समाजकारण करून समाजामध्ये नरूळे परिवार यांनी आपला वेगळा ठसा उमटविलेला आहे.

जय विजय सोप इंडस्ट्रीमध्ये बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चैनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी सदिच्छा भेट दिल्यानंतर उद्योग व्यवसायाच्या भरभराटीची यशोगाथा पहावयास मिळाली आणि प्रतिकूल परिस्थितीत यशाच्या शिखराकडे दैदीप्यमान वाटचाल सुरू असल्याचे दिसून आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button