Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेत रांझणीचे यश
रांझणी (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रांझणी केंद्र – आढेगाव ता. माढाची विद्यार्थीनी कु. अक्षरा रामकृष्ण कदम शिष्यवृत्ती जिल्हास्तर गुणवत्ता यादीत ३१७ वा क्रमांक प्राप्त करून शिष्यवृत्तीधारक ठरली आहे. त्याबद्दल तिच्यावर परिसरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यशस्वी अक्षरा व तिला मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक शिक्षक श्री. प्रविण वसुदेव काळे सर, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचे शाळा व्यवस्थापन समिती, पालक व सर्व ग्रामस्य रांझणी यांनी कौतुक केले व तिला यशाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Very well-written and funny! For more details, click here: EXPLORE NOW. Looking forward to everyone’s opinions!