जिल्हा बँकचे हेवि वेट, आजी-माजी संचालकासह, प्रभावशाली १०० थकबाकीदारांची नावे जाहीर ! कार्यवाहीकडे महाराष्ट्राचं लक्ष !!
नाशिक (बारामती झटका)
नाशिक जिल्हा बँकेचा थकित कर्ज वसुली संदर्भात सहकार आणि पणन विभागाच्या मार्गदर्शनाखाली वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे हजारो शेतकऱ्यांनी आपली हक्काची बँक समजुन पिक कर्ज, दिर्घ कालीन, तसेच अल्प मुदतीचे कर्ज उचलले, परंतु ते फेडतांना नाकीनऊ येत गेलं. शेती उद्योगांसाठी कर्जाची एकूण १,९१० कोटीची रक्कम वसुलीस पात्र असून त्यापैकी रक्कम रु.१,३७० कोटीची जुनी थकबाकी आहे. यात सुत गिरण्या, साखर कारखाने व इतर उद्योगांचा समावेश नाही. प्रशासकीय कारकिर्दीत जास्तीत जास्त थकीत कर्ज वसुली व्हावी व बँकेच्या खातेदारांना ठेवींची / खात्यावरील त्यांची बचतीची रक्कम उपलब्ध व्हावी यासाठी, जिल्ह्यातील मोठे, शेकडो एकर क्षेत्रावर द्राक्षाच्या बागा फुलवून नावारूपाला आलेले प्रभावशाली (हेवी वेट) असलेले बिग बागायतदार परंतु हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांचे नाव, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १०१ नुसार कारवाई करून मोठे (धनदांडगे) व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर थकबाकीची कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्हा बँकेने जिल्ह्यातील व तालुक्यातील हेवि वेट व प्रभावशाली राजकीय नेत्यांनी हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करता बँकेला चुना लावण्याचं काम केले आहे. वारंवार थकीत कर्ज भरण्यासाठी सहकारी संस्था अधीनियम १९६० अन्वये कर्ज वसुली संदर्भात नोटीसा देऊनही व वारंवार सौजन्याने, प्रेमानं तगादा लावूनही थकीत कर्जाचा बँकेकडे भरणा केला नाही. अश्या बिगबागायतदार व प्रभावशाली असलेल्या हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदार सभासदांच्या तालुकानिहाय याद्या तयार करून अश्या थकबाकीदार सभासदांचे बँकेस प्राप्त महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियमनुसार थकीत कर्ज रकमेसाठी तालुकानिहाय व जिल्हा १०० थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात / विविध कार्यकारी संस्थेत / जिल्हा बँकेच्या शाखेत जाहीर करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. जिल्ह्यातील १०० थकबाकीदारांची नावेही वर्तमानपत्रात जाहीर करण्यात येत आहेत. या कारवाईचे सर्व सामान्य शेतकऱ्यांकडून स्वागत होत असून, यापूर्वी धनदांडगे थकबाकीदार यांच्यावर कारवाई न करता सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनींचे निलाव जाहीर केले होते. नाशिक जिल्ह्यातील मोठ्या १०० थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात व विविध कार्यकारी संस्थेच्या कार्यालयात, तालुक्यातील सर्व शाखांमध्ये जाहीर करण्यात आले आहेत.
बँकेच्या प्रशासकांनी बँकेची सूत्र हातात घेतल्यानंतर ज्या पद्धतीने कर्ज वसुलीसाठी बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्तीचे आदेश देऊन कर्ज वसुलीचे आदेश दिले आहेत. स्थावर जंगम जप्तीव्दारे थकबाकी झालेले वाहने म्हणजे ट्रॅक्टर, जीप यांची जप्ती करून जवळपास ३५० वाहनांची जप्तीव्दारे / लिलावाव्दारे ६ कोटी रकमेची वसुली झाली आहे.
मार्च २०२३ अखेर जास्तीत जास्त कर्ज वसुली होण्यासाठी कर्ज वसुली मोहीम राबवून व जुने तसेच हेवि वेट थकबाकीदारांचे बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना सहकार कायदा १९६० व १९६१ चे नियम १०७ नुसार प्राप्त अधिकारान्वये जप्ती करून जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ६०० ते ७०० थकबाकीदारांचे स्थावर जप्ती आदेश दैनिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले असून पुढील लिलाव प्रक्रिया पर्यंतच्या कार्यवाहीसाठी आदेशही देण्यात आलेले आहेत. तालूक्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यानी तसेच नाशिक येथील केंद्र कार्यालयातील ऑफिस येथील कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही जुने मोठ्या थकबाकीदारांकडून सहकार्य मिळत नसल्याने अश्या १०० थकबाकीदार सभासदांची यादी वर्तमान पत्रात प्रसिद्ध करून त्यांना थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर कायद्यातील तरतुदीनुसार मोठ्या थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिकदृष्ट्या धोक्यात आणण्याचे महापाप तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केलं. कुवत असूनही जमीन, बंगला, गाड्या, संपत्ती, सुरक्षित ठेवुन, इतर पतसंस्था, बँका यांच्यामध्ये ठेवी ठेऊन जिल्हा बँकेकडून आपले आप्तस्वकीय, नातलग यांचे नावाने, करोडो रुपयांची कर्जे घेऊन बँकेला चुना लावणारे महाभाग, हेच आर्थिक डबघाईस जबाबदार आहेत. जाणूनबुजून कर्जे न भरणारी मोठमोठी बागायतदार, नेते मंडळी, आजी माजी संचालक, १०० मध्ये थकीत असणाऱ्यांची नावे वाचली की सर्व माहिती ध्यानात येते. शेतकऱ्यांची अर्थवाहीनी (कामधेनु) असणारी आपली लाईफ लाईन बंद अवस्थेकडे नेण्यास हेच हेविवेट सर्वस्वी थकबाकीदार जबाबदार आहेत. – कुबेर जाधव मा. जिल्हा अध्यक्ष सहकार आघाडी नाशिक
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This was such an interesting read! I chuckled a few times. For more laughs and insights, visit: DISCOVER HERE. Anyone else have thoughts on this?