Uncategorizedताज्या बातम्या

ज्येष्ठनेते जयसिंह मोहिते पाटील यांची उद्योजक सतीशतात्या ढेकळे यांनी घेतली सदिच्छा भेट…

अकलूज ( बारामती झटका )

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्यातील ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांची एकशिव गावचे युवा उद्योजक सतीशतात्या ढेकळे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी एकशिव गावचे कर्तव्यदक्ष व कार्यक्षम सरपंच शहाजीदादा धायगुडे, माजी उपसरपंच भारत साळवे, सामाजिक कार्यकर्ते किसन रुपनवर, संजय जगताप, सामाजिक युवा कार्यकर्ता श्रीकेश वरुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सतीशतात्या ढेकळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागातून जाऊन पुणे, पिंपरी-चिंचवड सारख्या भागामध्ये उद्योग व्यवसायामध्ये गगनभरारी घेतलेली आहे. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. ज्येष्ठ नेते कर्तव्यदक्ष सरपंच शहाजीदादा धायगुडे यांच्या विचाराने प्रेरित होऊन उद्योजक सतीशतात्या ढेकळे यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. ते काही कामानिमित्त गावाकडे आले होते, त्यावेळेस शहाजीदादा धायगुडे यांच्यासोबत अकलूज, शंकरनगर येथे गेलेले असताना सहकार महर्षी साखर कारखान्याच्या कार्यालयामध्ये माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते बाळदादा यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button