Uncategorizedताज्या बातम्या

डीपीवर काम करताना शॉक लागून लाईनमनचा मृत्यू #लाईनमन #बार्शी #शॉक #मालवंडी

बार्शी तालुक्यातील मालवंडीजवळ घडली घटना

बार्शी (बारामती झटका)

बार्शी तालुक्यातील मालवंडी शिवारात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी रोहित्रावर (डीपी) चढलेल्या लाईनमनचा शॉकने मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसत होता. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे.

निलेश रामभाऊ होनराव (वय २६) असे या लाईनमनचे नाव आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी तो रोहित्रावर चढला होता. तो आऊट सोर्सिंग (कंत्राटी कामगार) म्हणून कार्यरत होता. मालवंडी गावासह परिसरातील विद्युत पुरवठ्याची सर्व कामे तो करत होता. गुरुवारी दुपारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी मालवंडीच्या पश्चिमेला पाटील-म्हेत्रे यांच्या शेतातील असलेल्या या रोहित्रावर चढला होता. दरम्यान, विद्युत प्रवाह सुरू झाला आणि काही क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. निलेश लाईनमन म्हणून काम करत असताना मालवंडी परिसरात इलेक्ट्रिक अडचण असल्यास तो धावून जात असे‌. मात्र, गुरुवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान परमिट शिवाय निलेश काम करत नव्हता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, महावितरणचे अधिकारी भाग्यवंत यांना याबाबत विचारले असता त्यांनी या कामासाठी परमिट घेतले नसल्याचे सांगितले आहे.

तालुका पोलीस स्टेशनचे अरुण डुकळे व इतर पोलिसांनी येऊन त्याला नागरिकांच्यावतीने खाली उतरवून पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. निलेशच्या पश्चात आई-वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

साखरपुडा झाला, अक्षता राहिल्या…
अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी ९ मार्च रोजी निलेशचा मानेगाव येथील मुलीशी साखरपुडा झाला होता. १५ मे ही लग्नाची तारीख ठरली होती. लग्नासाठी मंगल कार्यालयही ठरवण्यात आले होते. घरात लग्नाची तयारी सुरू झाली होती. दरम्यान निलेशचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे मालवंडी व मानेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort