डॉ. ईश्वर रामचंद्र करडे यांचे दुःखद निधन.
खुडुस गावातील पत्रकार सचीन करडे यांना पितृशोक
माळीनगर (बारामती झटका)
(21 चारी) माळीनगर, ता. माळशिरस येथील रहिवाशी व सद्या खुडूस येथे स्थित डॉ. ईश्वर रामचंद्र करडे यांचे आजारपणामुळे ससून हॉस्पिटल, पुणे या ठिकाणी उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. डॉ. ईश्वर करडे यांनी बावीस वर्ष प्राथमिक आरोग्य केंद्र, या ठिकाणी आरोग्य सेवक म्हणून काम केले होते. ते सेवानिवृत्त होते. त्यांनी शंकरनगर, गोपाळपूर तसेच माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी प्रदीर्घ अशी सेवा केली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक म्हणून सेवा करत असताना त्यांचा सेवा करण्याचा मोठा हातखंडा असल्याने ते सर्व दूर परिचित होते. शांत, संयमी डॉक्टर म्हणून ते परिचित होते.
डॉ. ईश्वर करडे यांनी आपल्या नोकरीच्या कार्यकाळात एकही दिवस रजा घेतली नसल्याने त्यावेळीचे सीओ यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना रोख स्वरूपात बक्षिसहि प्रदान केले होते.
बावीस वर्षाच्या काळामध्ये त्यांनी सायकलवरती प्रवास करून गोरगरीब गरजू रुग्णांपर्यंत औषधोपचार देण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले भाऊ, बहीण असा परिवार आहे. पत्रकार सचिन करडे यांचे ते वडील होते.
त्यांच्यावरती अकलाई स्मशानभूमी अकलूज या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले असून रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम शनिवारी आहे.
त्यांच्या जाण्याने सध्या वास्तव्यास असलेली खुडूस व मूळ गाव माळीनगर दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे. बारामती झटका परिवार यांचेकडून मृतात्म्यास शांती लाभो व करडे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच भावपूर्ण आदरांजली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng