डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस येथे बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त जयंती महोत्सवाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, नातेपुते यांच्यावतीने करण्यात आले आहे. या जयंती महोत्सवामध्ये दि. १ एप्रिल ते दि. १४ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन रमामाता चौक, नातेपुते येथे करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. १४ एप्रिल रोजी सकाळी भव्य मोटार सायकल रॅली नातेपुते शहरातून काढण्यात येणार आहे. तसेच ध्वजारोहण, अभिवादन सभा असे कार्यक्रम यावेळी संपन्न होणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थितीत आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, सोलापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. पी. मोरे, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन रघुनाथ अण्णा कवितके, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक त नातेपुते ग्रामपंचायतचे माजी सदस्य जनार्दन सोरटे, नातेपुते ग्रामपंचायतचे माजी सरपंच महावीर आबा साळवे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, बाजार समिती सभापती नगरसेवक अतुल पाटील, नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे, नातेपुते नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक दादासाहेब उराडे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या साक्षी सोरटे, माळशिरस पंचायत समितीच्या माजी सदस्या वैशाली साळवे, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र नेते युवराज वाघमारे, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक सुरेंद्र भैय्या सोरटे, नातेपुते नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर, नातेपुते ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भारत सोरटे, रेणुका पतसंस्थेचे उपाध्यक्ष महेश शेटे, नगरपंचायतीचे नगरसेवक दीपक काळे, नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे संचालक बाहुबली शेठ चंकेश्वरा, नातेपुते ग्रामपंचायतचे माजी सदस्य अतुलशेठ बावकर, एम. एम. एस. एम. पी कॉलेजचे प्राचार्य डॉ. कोळेकर सर, मुंबई पोलीस सुमित सोरटे, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक रावसाहेब पांढरे, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक अविनाश शेठ दोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निजाम काझी, ज. उ. स. माजी अध्यक्ष बाळासाहेब सोरटे, ज. उ. स. माजी अध्यक्ष नवाज सोरटे, प्रा. उपाध्यक्ष रा. स. प. अल्प. संख्या. आ. बशीर काझी, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब लाळगे, उद्योजक संतोष वाघमोडे, रिपाईचे तालुका कार्याध्यक्ष विनोद रणदिवे, नातेपुते ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नम्रता व्होरा, एस. एम. एस. पी. एम. कॉलेजचे प्राध्यापक उत्तम सावंत सर, नातेपुते तलाठी कार्यालयाचे कोतवाल गोरख ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब काळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लतीफ भाई नदाफ, उद्योजक आक्रम बागवान, शिवसेना तालुका उपप्रमुख अमोल उराडे, नातेपुते नगरपंचायतीच्या नगरसेविका स्वाती बावकर, नगरसेविका शर्मिला चांगण, नगरसेविका सविता बरडकर, नगरसेविका अनिता लांडगे, नगरसेविका दीपिका देशमुख, नगरसेविका भारतीताई पांढरे, नगरसेवक अण्णा पांढरे, नगरसेविका संगीता काळे, नगरसेवक रणजीत पांढरे, नगरसेविका माया उराडे, नातेपुते ग्रामपंचायतच्या माजी सदस्य सविता सोरटे, सामाजिक कार्यकर्ते पोपट साळवे, संविधान ग्रुपचे अध्यक्ष वैभव सोरटे, सामाजिक कार्यकर्ते विनायक सावंत सर, सामाजिक कार्यकर्ते सुनील ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते राहुल भोसले आदी उपस्थित राहणार आहेत.
यामध्ये दि.१ एप्रिल रोजी प्रतिमा पूजन, लोकशाहीचा चौथा स्तंभ नातेपुते शहरातील सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा व ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाचा शतकोत्तर सन्मान सोहळा करण्यात येणार आहे. दि. २ एप्रिल रोजी पाककला स्पर्धा, दि. ३ एप्रिल रोजी फनी गेम्स, दि. ४ एप्रिल रोजी फनी गेम्स, दि. ५ एप्रिल रोजी ओंकार अनिकेत सप्तसुर, दि. ६ एप्रिल रोजी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.
तसेच ७ एप्रिल रोजी नितीन चंदनशिवे दंगलकार, दि. ८ एप्रिल रोजी सम्राट गायन पार्टी, दि. ९ एप्रिल रोजी डॉ. सत्येंद्र चव्हाण (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे) छत्रपती संभाजी महाराज अभ्यासक यांचे व्याख्यान होणार आहे. दि. १० एप्रिल रोजी भारतीय संविधानाची गौरव गाथा सीमा पाटील व ज्योती मोरे, मुंबई हे सादर करणार आहेत. दि. ११ एप्रिल रोजी दादाभाऊ अभंग यांचे फुले शाहू आंबेडकर विचार प्रबोधन, दि. १२ एप्रिल रोजी महिला व पुरुष कॅन्सर निदान शिबिर नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी यांचे आरोग्य शिबिर होणार आहे. दि. १३ एप्रिल रोजी भीम जल्लोष कार्यक्रम होणार आहे.
तरी या कार्यक्रमांचा लाभ नातेपुते परिसरातील जास्तीत जास्त बांधवांनी घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng