डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन तात्यांनी जनतेची व समाजाची सेवा केली – लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते.

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस शहराचे उपसरपंच पासून सोलापूर जिल्हा परिषद सदस्य पदापर्यंत काम करीत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन भीमराव तात्या यांनी जनतेची व समाजाची सेवा केलेली आहे. समाजामध्ये आदर्शवत असे काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केलेली होती. तात्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी ठरणार आहे. तात्यांचा वसा व वारसा नगरसेवक आकाश सावंत व त्यांचे परिवार पुढे चालवत आहेत. आठव्या स्मृतिदिनाला समाज उपयोगी असणारे उपक्रम राबवले. त्यामध्ये सर्व रोग निदान शिबिर, रक्तदान शिबिर व वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम राबवून स्मृतिदिन साजरा केलेला आहे, असे वक्तव्य भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व माळशिरस नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका श्रीमती लक्ष्मी सावंत यांचे पती लोकनेते स्वर्गीय भीमराव तात्या सावंत यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतिगंध कार्यक्रमात भावपूर्ण आदरांजलीपर बोलताना सांगितले.


यावेळी माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान
नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक बापू वाघमोडे, खंडकरी शेतकरी नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील, उपनगराध्यक्ष वैजनाथ वळकुंदे, माजी उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, नगरसेवक उद्योजक सचिन वावरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष नगरसेवक सुरेशभाऊ टेळे, नगरसेवक कैलास वामन, नगरसेवक रणजीत ओव्हाळ, नगरसेवक महादेव कोळेकर, नगरसेवक विजयराव देशमुख, नगरसेवक आबा धाईंजे, नगरसेवक दादा शिंदे, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप पाटील, पोलीस पाटील शितल पाटील, बाळासाहेब वावरे, बुवानाना धाईंजे, वकील संघटनेचे आप्पासाहेब वाघमोडे, सीताराम झंजे, सुमित सावंत, माजी नगरसेवक सुरेश वाघमोडे, माजी पंचायत समिती सदस्य अनिल सावंत, ज्येष्ठ पत्रकार गहिनीनाथ वाघंबरे, भाजपचे तालुका सरचिटणीस संजय देशमुख, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, शहर उपाध्यक्ष भाजपा राजेंद्र वळकुंदे आदी मान्यवरांसह सावंत परिवार यांचे नातेवाईक व मित्रपरिवार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, ज्येष्ठ पत्रकार गहिनीनाथ वाघंबरे सर, ॲड. सोमनाथ वाघमोडे, बाळासाहेब सरगर, सचिन वावरे, सुरेशभाऊ टेळे यांनीही आपले विचार व्यक्त केले.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng