डोंबाळवाडीकरांचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न सुटला, डोंबाळवाडी ते जिनपूरी रस्त्याच्या कामाला मिळाली 4.50 कोटींची मंजुरी
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते यांच्या प्रयत्नाला यश…
नातेपुते( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जेष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेचे आमदार युवा नेते रणजीतसिंह मोहिते पाटील व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते, भाजपचे जिल्हा संघटक धैर्यशीलभैय्या मोहिते पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या अथक प्रयत्नातून वर्षानुवर्ष रखडलेल्या डोंबाळवाडी सारख्या दुर्गम गावाचा प्रश्न म्हणजे जिनपूरी ते डोंबाळवाडी सहा किलोमीटर रस्त्याचे काम मंजूर केल्याबद्दल डोंबाळवाडी ग्रामपंचायत, डोंबाळवाडी विकास सोसायटी, संग्रामसिंह विकास सोसायटी, श्रीनाथ मंदिर ट्रस्ट या संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य आणि ग्रामस्थांनी आभार मानले.
डोंबाळवाडी ते जिनपूरी या रस्त्याच्या कामासाठी अनेक नेते मंडळीकडे पाठपुरावा केला होता. परंतु, कोणी लक्ष दिलेले नव्हते. मात्र, या कामात मुख्यमंत्री सडक योजनेतून भरघोस असा साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी आ. रणजितसिंह मोहिते पाटील व आ. राम सातपुते यांनी आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विशेष प्रयत्न करून परिसरातील लोकांची अनेक दिवसाची अडचण लक्षात घेऊन खास बाब म्हणून मंजूर करुन घेतला आहे.
सदरच्या रस्त्याने डोंबाळवाडी, शिंदेवाडी, देशमुखवाडी, हनुमानवाडी व गुरसाळे या गावातील लोकांना नातेपुते व माळशिरस या ठिकाणी बाजारपेठेत जाण्यासाठी तसेच शाळा, दवाखाना, शेतमाल वाहतूक, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती इ. कामासाठी जाणार्या लोकांची चांगली सोय होणार आहे. रस्ता नसल्याने बंद झालेली एसटी सुरु होईल व विकासाला चालना मिळेल. त्यामुळे सर्वत्र डोंबाळवाडी पंचक्रोशीत आनंद व्यक्त होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng