डोंबाळवाडी येथे ह.भ.प. प्राध्यापक रामदास महाराज कदम सर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार
कै. जाईबाई मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
डोंबाळवाडी (बारामती झटका)
डोंबाळवाडी ता. माळशिरस येथे कैलासवासी जाईबाई बाबा मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शनिवार दि. २४/६/२०२३ रोजी प्राध्यापक रामदास महाराज कदम सर यांचे फुलांचे कीर्तन होणार आहे. तसेच यावेळी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन राजाभाऊ सोनवलकर पाटील सर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
त्यामध्ये मोफत डोळे तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी शालेय मुलांना ५०१ वह्यांचे वाटप व ५०१ वृक्ष वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत असणार आहे.
तरी मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng