Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या वाटा खुल्या झाल्या – डॉ. दिपक पाटेकर

अकलुज (बारामती झटका)

आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानात वेगाने बदल होत आहेत. हेच तंत्र विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी, माळशिरस तालुक्यातील एमकेसीएलचे अधिकृत कॉम्प्युटर सेंटर व एमकेसीएलचे सोलापूर जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यामाने तंत्रज्ञानातील करिअरच्या वाटा या विषयावर चर्चासत्र अकलूज येथे आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

यावेळी महाराष्ट्र शासन एमकेसीएलचे डेप्युटी जनरल मॅनेजर डॉ. दिपक पाटेकर, सोलापूर जिल्हा समन्वयक रोहित जेऊरकर, उपजिल्हा समन्वयक हारून शेख, मलिक शेख, हबीब पंजावाले, शेखर अडगले तसेच माळशिरस तालुक्यातील अधिकृत कॉम्प्युटर सेंटरचे प्रमुख उपस्थित होते.

दहावी-बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं, वेगवेगळ्या कोर्सेसची नेमकी माहिती कुठून मिळवायची हा अनेकांसमोर प्रश्न असतो. ही माहिती असेल तर तुमच्यासाठी अनेक गोष्टी सोप्या होतील. पारंपरिक अभ्यासक्रमांसह वेगवेगळ्या करिअरच्या वाटा जाणून घेत विद्यार्थ्यांनी यशस्वी करिअरच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले पाहिजे. दहावी बारावीच नव्हे तर पदव्युत्तर पदवी विद्याशाखांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांतील करिअरचे पर्याय असो की माहिती, तंत्रज्ञान क्षेत्राला आलेले अभूतपूर्व महत्त्व सोबत घेऊनच, एकविसाव्या शतकात एमकेसीएलने क्लिक कोर्सच्या माध्यमातून ३५ कोर्स आणले आहेत. संगणकीय शक्तीने आणखीनच आश्वस्त केले की, नवीन आणि अधिक चांगली तंत्रज्ञाने येत्या काळात झपाट्याने विकसित होतील आणि मानवी इतिहासात कधी नव्हे इतकी प्रगती या काळात साधली जाईल. उगवते तंत्रज्ञान या संज्ञावलीची व्याख्या एकतर नव्या तंत्रज्ञानाचा विकास किंवा मग विद्यमान तंत्रज्ञानाची निरंतर प्रगत होण्याची प्रक्रिया जी पुढील काही वर्षांत सर्वत्र उपलब्ध असेल, अशी केली जाऊ शकेल. त्रिमितीय छपाई (थ्रीडी प्रिंटिंग), कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सूक्ष्मतंत्रज्ञान (नॅनोटेक्नॉलॉजी), ५ जी वायरलेस कम्युनिकेशन, स्कंद पेशी उपचार पद्धती (स्टेम सेल थेरपी) आणि डिस्ट्रिब्युटेड लेजर ही या तंत्रज्ञानाची वानगीदाखल उदाहरणे आहेत, असे डॉ दिपक पाटेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील अधिकृत कॉम्प्युटर सेंटरचे प्रमुख मदत केली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort