Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्या

तरंगफळ येथील शेतकऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याचे दिले लेखी आश्वासन

तरंगफळ (बारामती झटका)

तरंगफळ ता. माळशिरस या गावातील शेतकरी शेती पंपाला पुरेशी व वेळेवर मिळत नसल्याने त्रस्त आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी दि. २३/०५/२०२३ रोजी उग्र आंदोलन पुकारले होते. त्याचीच दखल घेऊन आज महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. एस. पी. गायकवाड साहेब यांनी महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांची व तरंगफळ ग्रामस्थांची बैठक घेतली. येत्या चार दिवसात सर्व उपाययोजना करून तरंगफळ ग्रामस्थांना पूर्ण क्षमतेने वीज देण्याचे लेखी आश्वासन तरंगफळचे सरपंच, ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते यांना समक्ष दिले.

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले होते कि, गेल्या दहा वर्षांपासून तरंगफळ येथील शेती पंपाला पुरेशी व वेळेवर लाईट मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. त्यातच यावर्षी मार्च, एप्रिल व मे महिन्यात एकही दिवस पुरेशी दाबाने किंवा पूर्ण क्षमतेने वीज मिळाली नाही. उभी पिके डोळ्यांसमोर जळत आहेत. वेळोवेळी माळशिरस, अकलूज ऑफिसला भेटून पाठपुरावा करूनसुद्धा दखल घेतली गेली नाही. त्यामुळे दि. २३/०५/२०२३ पूर्वी दखल न घेतल्यास समस्त ग्रामस्थ व शेतकरी पूर्व परवानगीने अकलूज येथील महावितरणच्या ऑफिस समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले होते.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. यावर उपाययोजना नाही केली तर सर्व ग्रामस्थ पुन्हा चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, असे तरंगफळ ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण उर्फ तात्यासो तरंगे यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button