तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय करून प्रगती करावी – खंडकरी शेतकरी नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे.
युवकांच्या हाताला काम मिळण्याकरता धुळदेव म्हसवड कॉरिडॉरमध्ये गारवाडचा समावेश होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
विझोरी ( बारामती झटका)
समाजामध्ये अनेक तरुण शिक्षित व पदवीधर आहेत. शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये काम करणाऱ्यांपेक्षा जास्त तरुण हे नोकरीविना आहेत. तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय करून आर्थिक प्रगती करावी, असे मत लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे यांनी विझोरी निमगाव पाटील येथील अस्सल गावरान शाकाहारी व मांसाहारी चायनीज सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषण करताना सांगितले.


निमगाव पाटी येथे अस्सल गावरान चायनीज सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सोमनाथ अण्णा वाघमोडे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सचिन शेंडगे होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलन वीर अजितभैया बोरकर, पिसेवाडी ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य साहिल आतार, गितेश चौगुले, आहील पठाण, तेजस भाकरे, प्रेमकुमार चौगुले, संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवरांसह पंचक्रोशीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली होती. पुढे बोलताना ॲड. सोमनाथ वाघमोडे म्हणाले, दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढत आहे. सर्वांनाच नोकरी मिळते असे नाही. युवकांच्या हाताला काम मिळण्याकरता धुळदेव म्हसवड कॉरिडॉरमध्ये माळशिरस तालुक्यातील गारवाडचा समावेश होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून भविष्यामध्ये उद्योग व्यवसायामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होऊन तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि माळशिरस तालुक्यात विकास होऊन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त केले. तसेच यावेळी डॉ. सचिन शेंडगे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी अस्सल गावरान चायनीज सेंटरचे मालक निलेश घुले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर आभार दादासाहेब वाघंबरे यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
