Uncategorized

दशक्रिया विधीला वंचित मुलांच्या शिक्षणाला मदत, चऱ्होली बु. येथील मोळक कुटुंबाचा आदर्श उपक्रम

पुणे (बारामती झटका)

पुणे महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त मा. श्री. ज्ञानेश्‍वर मोळक यांच्या मातोश्री कै. श्रीमती सरस्वती मोळक यांचे दि. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी निधन झाले होते. अशा दुःखद प्रसंगी स्वतःला सावरत मा. सौ. शैलजाताई व मा. श्री. ज्ञानेश्‍वर मोळक व कुटुंबीयांनी कै. श्रीमती सरस्वती मोळक यांच्या दशक्रिया विधीला सामाजिक दृष्टीकोनातून अजित फाऊंडेशनला आर्थिक मदत करून नवा आदर्श निर्माण केला. आपल्या आईच्या रूपातून मायेची सावली हरवली असताना मदतीच्या माध्यमातून वचितांना ती सावली देऊन आईच्या स्मृती कायम जपल्या आहेत.

अजित फाऊंडेशन ही संस्था स्थलांतरित, निराधार व शाळाबाह्य मुलांसाठी कार्य करते. विविध पार्श्वभूमी लाभलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम मागील १५ वर्षांपासून सुरु आहे. पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे सध्या मुलींसाठी सृजनालय प्रकल्प कार्यरत आहे. याच मुलींच्या शिक्षणासाठी मदत व्हावी, या भावनेतून मोळक कुटुंबीयांनी दशक्रिया विधीस अजित फाउंडेशनच्या विनया निंबाळकर यांचेकडे धनादेश सुपूर्द केला. प्रशासनात असताना मा. श्री. ज्ञानेश्‍वर मोळक यांनी अनेक गरजूंना मदत व सहकार्य केले. त्याचबरोबर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना मोळक कुटुंबानी दिलेले सामाजिक दातृत्व आदर्शवत आहे. समाजातील इतरांनी हा आदर्श घेऊन लग्न व इतर विधिसाठी होणारा खर्च टाळावा. समाजातील बदलांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना पाठबळ देण्याची गरज आहे. मोळक कुटुंबियांच्या दुःखात आम्ही, मुले व अजित फाऊंडेशन सामील आहोत. मातोश्री कै. श्रीमती सरस्वती मोळक यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.

आपणही अशा सुख-दुःखांच्या प्रसंगी सामाजिक योगदान देऊन वंचितांच्या प्रवाहात आणण्याच्या कार्यात सहभाग नोंदवा. आम्हाला 098228 97382 संपर्क करा किंवा 9405024613@okbizaxis या Google Pay करा.

विनया निंबाळकर,
9096812860
अजित फाऊंडेशन टीम.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button