Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

दहावीच्या परीक्षेत नातेपुतेतील विविध शाळांचे यश

दाते प्रशालेची साक्षी गोरे प्रथम तर, मृण्मयी लोंढे, उन्नती बोराटे द्वितीय

नातेपुते (बारामती झटका)

महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इ. १० वीच्या परीक्षेचा निकाल लागला असुन यामध्ये नातेपुते येथील डॅा. बा. ज. दाते प्रशालेचा ९६.८८ टक्के, चंद्रकांत घुगरदरे प्रशाला ९० टक्के तर गिरवी येथील कै. रंगनाथ शंकर तथा भाऊसो कुलकर्णी माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.

यामध्ये नातेपुते एज्युकेशन सोसायटी संचलित डॅा. बा. ज. दाते प्रशालेत प्रथम क्रमांक साक्षी सुधीर गोरे (९७.४०%) तर द्वितीय क्रमांक मृण्मयी आनंदकुमार लोंढे (९६.४०%), उन्नती सचिन बोराटे (९६.४०%) तर तृतीय श्रावणी तुकाराम भोमाळे (९६.२०%), अक्षय शिक्षण संस्था संचलित चंद्रकांत घुगरदरे प्रशालेत प्रथम आदित्य संजित ऐवळे (९३.८०%), द्वितीय रामेश्वरी राणोजी सुतार (९१.२०%), तृतीय ऋतुजा महेश लाळगे (९०.४०%) तर कै. रंगनाथ शंकर तथा भाऊसो कुलकर्णी माध्यमिक विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक अक्षरा रमेश सावंत (९५%), द्वितीय गौरी सुभाष गेजगे (९२%), तृतीय समिक्षा किसन कुलाळ ९१.६० टक्के गुण मिळवून यशस्वी झाल्या.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॅा. एम. पी. मोरे, बाबाराजे देशमुख, ॲड. डी. एन. काळे, मामासाहेब पांढरे, मुख्याध्यापक विठ्ठल पिसे यांनी तर अक्षय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ कवितके, सचिव दिलीप घुगरदरे, मुख्याध्यापक रवींद्र चांगण यांनी अभिनंदन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button