दि सासवड माळी फॅक्टरीचे चेअरमन रंजनभाऊ गिरमे यांनी माळशिरस विधानसभेचे आ. राम सातपुते यांची सांत्वनपर भेट घेतली.
मांडवे (बारामती झटका)
दि सासवड माळी शुगर फॅक्टरी, माळीनगर ता. माळशिरस, या साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे यांनी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांची माळशिरस तालुक्यातील मांडवे 50 फाटा येथील श्रीराम निवासस्थान येथे शनिवारी दि. 01 जुलै 2023 रोजी सकाळी सांत्वनपर भेट घेतली.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांचे सोमवार दि. 26/06/2023 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी दुःखद निधन झालेले होते. त्यांच्यावर मूळगावी डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड, येथे अंतिम संस्कार करण्यात आलेले होते. सर्व विधी, क्रियाकर्म करून शुक्रवार दि. 30/06/2023 पासून सर्वांना भेटीसाठी माळशिरस मतदारसंघात उपलब्ध झालेले आहेत.
दि सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर, ता. माळशिरस चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे यांनी स्वर्गीय सौ. जिजाबाई विठ्ठल सातपुते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी काँग्रेसचे नेते शिरीष फडे उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This article had me hooked! For those curious, here’s more: DISCOVER MORE. What are your thoughts?