Uncategorized

दुधाला कमीत कमी ३५ रु. भाव द्यावाच लागेल – राधाकृष्ण विखे पाटील

पशुखाद्याचे दर २५ टक्क्याने कमी करण्याचे आश्वासन

पुणे येथे राधाकृष्ण विखे पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना, दूध उत्पादक, दूध संघ प्रतिनिधी यांची बैठक संपन्न

पुणे (बारामती झटका)

आज पुणे येथे झालेल्या दूध दरवाढ मीटिंगमधे राधाकृष्ण विखे पाटील यांची सकारात्मकता दिसून आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकरतात्या माने देशमुख यांनी दुधातील भेसळ कमी केल्यास दूध दरवाढ होईल, कोणताही शेतकरी भेसळ करत नाही, पीक विम्याच्या धर्तीवर पशुधन विमा चालू करावा या मागण्या केल्या. याला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले की, भेसळ रोखण्यासाठी कलम २७२ व कलम २७३ मजबूत करणार आरए चे २५० कर्मचारी भेसळ प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करून त्यांचा स्टाफ वाढवणार, भेसळ प्रतिबंधक विभागाला भरारी पथके नेमण्यात आदेश देण्यात येतील, या पथकात उपजिल्हा अधिकारी अॅड. एस. पी. पथक तयार करण्यात येईल, तसेच पीक विमा आहे तसा पशूधन विमा १ ते ३ रू. मध्ये चालू करण्याचा विचार सरकार करत आहे व दुधाचे दर कमीत कमी ३५ रुपयेच द्यावा लागेल असे सांगितले.

तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव यांनी मकेचे दर २४००/- वरून १८०० वर आले तरी पशुखाद्य मात्र जास्त दराने विक्री होतात. दूध संघ प्रतिनिधींनी पशू खाद्य कमी किंमतीत विकणे परवडत नसल्याचे सांगितले. यावर महोदयांनी तातडीने पशूखाद्य दर २५ टक्के खाली आणण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातून रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल बिडवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटना वेळापूर शहराध्यक्ष सचिन पवार, शुभम सोनवर, सौरभ वळवडे, अनिल बाबर यांच्यासह दूध संघ प्रतिनिधी, शेतकरी, अधिकारी वर्ग उपस्थित होता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button