दुसऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांची निवड
अहमदनगर (बारामती झटका) गुरुनाथ तिरपणकर यांजकडून
श्रीरामपूर येथील निसर्ग कवी सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांची दुसऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. कवी यांनी शंभर पेक्षा जास्त मराठी चित्रपटात गीतलेखन केलेले आहे. सत्तावीस मालिकांसाठी, आकाशवाणी, दुरदर्शन, विविध वाहिन्यांकरीता गीतलेखन केलेले आहे. ‘पायपोळ’ हे त्यांचे अत्यंत गाजलेले आत्मचरित्र आहे.
सांजगंध, भंडारभुल, चित्ररंग, पिवळण ही त्यांची लोकप्रिय ग्रंथ संपदा आहे. त्यांनी गीतलेखन आणि पटकथा लेखन केलेले चित्रपट घुंगरांच्या नादात सत्ताधीश, झुंजार, शिवा, मध्यमवर्ग, मी सिंधुताई सपकाळ, तुझा दुरावा, निर्भया, हळद तुझी कुंकु माझं, जुगाड, लग्नाची वरात लंडनच्या घरात, राजमाता जिजाऊ इत्यादी अनेक चित्रपट लोकप्रिय झालेले आहेत. आशाअभिलाषा, स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतील त्यांची सर्व गीते लोकप्रिय आहेत. सध्याचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

आशा भोसले, उत्तरा केळकर, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, रुपकुंवर राठोड, साधना सरगम, कैलाश खेर, उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, वैशाली सामंत, रविंद्र साठे, वैशाली माडे या दिग्गज गायक गायिकांनी त्यांची सातशे हुन अधिक गाणी गायिली आहेत. अनेक चित्रपटात त्यांनी भुमिका केलेल्या आहेत. प्रतिकुल परीस्थितीत त्यांच्या सांस्कृतिक कार्याला मिळालेल्या यशामुळे त्यांना या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देण्यात आल्याची माहिती कवीश्री अमोल घाटविसावे आणि कविवर्य हृदय मानव तसेच विद्रोही विचार मंच यांनी कळविले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
