Uncategorizedताज्या बातम्या

देशातील सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची ७० हजार कोटी रूपयांची जल जीवन मिशन योजना – केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयजी मिश्रा.

माढा (बारामती झटका)

मौजे पडसाळी, ता. माढा येथे जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयजी मिश्रा यांच्याहस्ते कोनशिलेच अनावरण करून करण्यात आला. यावेळी पडसाळी गावचे सरपंच योगेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रास्तविकात त्यांनी योजनेसंदर्भातील माहिती दिली. तसेच मागील ८ महिन्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन ७० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करून घेतल्याचे सांगितले. पडसाळी ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासुन व्यायामशाळा गावाला मिळाली नाही ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन मंजुर करून घेतली. गावकऱ्यांनी अशीच साथ दिली तर गावाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, असे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, मागील खासदार निवडुन गेल्यानंतर परत आलेच नाहीत. मी तसे न करता प्रत्येक गावाला निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मी पडसाळी येथे खासदार फंडातून जोतिबा मंदीर समोर सभामंडप ७ लक्ष रूपये तसेच क्रिडा विभागाच्या माध्यमातुन जीमसाठी ०७ लक्ष रूपयाचे जीम साहित्य तसेच माळी-मगर वस्ती व पाटील-साळुंखे वस्तीसाठी डीपीडीसीतुन सुमारे १५ लक्ष रूपयांचे विद्युत ट्रान्सफार्मर आणि डीपीडीसीच्या ३०५४ हेडमधुन ३५ लक्ष रूपयांचे रस्ते मंजुर करून दिले आहेत. तसेच दलित वस्ती सुधार योजनेतून ११ लक्ष रूपयांचा निधी मंजुर केला आहे. आपण माझे लाडके सरपंच योगेश पाटील यांच्या मागे खंबीर उभे रहावे मी पडसाळी व परिसरातील गावांना निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला.

यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री अजयजी मिश्रा म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यानंतरही देशातल्या ज्या गावांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नव्हते. अशा गावांमध्ये नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याचा संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सोडला होता. त्यानुसार देशातील प्रत्येक गावात जल जीवन मिशनच्या माध्यमातुन हर घर नल, हर घर जल या योजनेचा शुभारंभ करण्याची संधी या माध्यमातुन मिळत आहे. या योजनेत प्रत्येक गावात नवीन विहीर, पाणी टाकी, पाईपलाईन, प्रत्येक घराला नळ अशी कामे चालु आहेत. यात त्या गावची २०५३ सालची लोकसंख्या लक्षात घेऊन आराखडा तयार करण्यात आला आहे. या जलजीवन मिशन योजनेसाठी लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने माढा तालुक्यातील १११ गावांसाठी सुमारे १०७ कोटी रूपयांचा निधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन उपलब्ध झाला आहे. त्यात एकट्या पडसाळी गावासाठी ७७ लक्ष रूपयांचा निधी देण्यात आला आहे. माझे भाग्य समजतो की, मी आपल्या पडसाळी गावात या योजनेचे भुमीपूजन करण्यासाठी येऊ शकलो. केंद्र सरकारने या योजनेसाठी आवश्यक तितका निधी पुरवला आहे. इतक्या वर्षात पहिल्यांदाच प्राथमिक सोयी सुविधांवर काम झाले आहे. त्यामुळे आजचा क्षण हा प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण असल्याची भावना यावेळी बोलताना व्यक्त केली. मागील ९ वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने अनेक चांगले व मजबूत असे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत.

या कार्यक्रमासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, राजकुमार पाटील, करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, पंढरपूर तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, डेप्युटी सीओ शेळकंदे साहेब, पाणी पूरवठ्याचे कार्यकारी अभियंता कटकधोंड साहेब, जलतज्ञ अनिल पाटील, माऊली हळणवर, प्रकाश घोडे, उमेश पाटील, उप कार्यकारी अभियंता वाघमारे साहेब, बेंबळे गावचे सरपंच विजय पवार, भेंडचे सरपंच डॅा. संतोष दळवी, सोलनकरवाडीचे सरपंच बाबासाहेब पांढरे यांच्यासह विविध गावचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पडसाळी गावातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे सत्कार कुर्मदास पाटील यांनी व सुत्रसंचालन ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले. तसेच मान्यवरांचे आभार ग्रामसेवक रूपाली सुर्वे यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button