Uncategorizedताज्या बातम्या

धर्मपुरी ग्रामपंचायतवर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी ए.एम.सरवदे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

विभागीय आयुक्त यांनी सरपंच बाजीराव काटकर यांना पदावरून काढले तर ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंच सौ. सुनीता माने यांच्यावर अविश्वास ठराव पारित करून पदमुक्त केले.

धर्मपुरी ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील आदर्श गाव धर्मपुरी ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून माळशिरस पंचायत समिती मधील कृषी विस्तार अधिकारी ए एम सरवदे यांची नेमणूक माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांनी केलेली आहे.


विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांनी लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच बाजीराव काटकर यांना 17/ 11/ 20 21 पासून सरपंच पदावरून काढून टाकलेले होते. तर उपसरपंच सौ सुनीता माने यांच्यावर सर्व सदस्यांनी 08/08/2022 बहूमताने अविश्वास ठराव दाखल करून मंजूर केलेला होता.माने यांच्या कडे प्रभारी सरपंच पदाची जबाबदारी होती. धर्मपुरी ग्रामपंचायतला सरपंच व उपसरपंच पद रिक्त झाल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 35 ( 3 ब) अन्वये ग्रामपंचायत कडील कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने व सदरचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी श्री.ए. एम सरवदे विस्तार अधिकारी कृषी यांची ग्रामपंचायत धर्मपुरी कार्यालयीन कामकाज पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नेमणूक गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस श्री विनायक गुळवे यांनी केलेली आहे.

माळशिरस तालुक्याच्या सरहद्दीवर सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या वेळी धर्मपुरी ग्राम पंचायत स्वागत करीत असते अशा आदर्श ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदी प्रशासकीय कामकाजात तरबेज असणारे ए.एम.सरवदे यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे खोळंबलेल्या विकास कामांना गती मिळणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button