Uncategorized

धर्मपुरी जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर यांची निवेदनातुन केली मागणी

अकलूज ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 मध्ये मौजे धर्मपुरी येथील जिल्हा परिषदेच्या बाधीत शाळांची जागा व बांधकाम रखडले असल्याने शाळेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

सदर निवेदनामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 आळंदी पुणे पंढरपूर मोहोळ रोडवरील मौजे धर्मपुरी ता. माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र धर्मपुरी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववस्ती या दोन शाळा बाधित झालेल्या आहेत. या दोन्ही शाळांची पुर्विची बांधकामे रस्ता रूंदीकरणामध्ये दि. 02/07/2019 रोजी पाडली गेली असून सदर शाळांसाठी नुकसान भरपाई जिल्हा परिषद शाळा केंद्र धर्मपुरी पटसंख्या 220 असलेल्या शाळेला 1,36,45,542 रुपये व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधव वस्ती पटसंख्या 30 असलेल्या शाळेला 72,95,836 रुपये इतकी रक्कम मुख्यलेखा वित्त अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांचे खातेवर दि. 22/01/2020 व 11/06/2020 रोजी जमा आहेत.

सदर रक्कम जमा होऊन तीन वर्ष होत आले असून अद्यापपर्यंत जागा खरेदी व बांधकाम करण्यात आले नाही. दोन्ही शाळा सध्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये भरत आहेत. चारही बाजूने पत्रे असल्यामुळे विद्यार्थ्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वर्गामध्ये भरपूर गर्दी होत आहे, शौचालय, पिण्याचे पाणी व इतर कोणतीही भौतिक सुविधा सध्या उपलब्ध नसल्यामुळे शाळांचा पट कमी होत चालला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून शाळा इतर बांधकामास विलंब होत आहे. तरी लवकरात लवकर जागा खरेदी करून शाळा इमारतींचे बांधकाम पूर्ण करून विद्यार्थ्यांची गैरसोय थांबविण्याकरता आपल्या स्तरातून प्रयत्न करण्यात यावेत, असे निवेदन देण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort