नातेपुतेमध्ये धनगर समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे भव्य आयोजन
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुतेमध्ये समस्त धनगर समाज राज्स्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दि. ३० एप्रिल रोजी नातेपुते येथील प्रसिद्ध राजआनंद मंगल कार्यालय, नातेपुते येथे करण्यात आले आहे. नातेपुतेमध्ये वधू वर मेळाव्यास कायमस्वरूपी चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समस्त धनगर समाज वधूवर मेळाव्याचे अध्यक्ष विजयकुमार रघुनाथ उराडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की, आपल्या दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्याहीपेक्षा वधुवर निवडीचा प्रश्न सध्याच्या काळात जास्तच बिकट होत चालला आहे. त्यामुळे आम्ही समाजातील बांधव एकत्रीत येऊन या राज्य स्तरीय धनगर समाज सर्व पोट शाखीय वधूवर मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यामध्ये समस्त समाज बांधवांकडून शेतकरी कुटुंबातील व्यवसायिक, सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरदार, पदवीधर, इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील मुला-मुलींची नाव नोंदणी होत आहे. अजूनही इच्छुक मुला-मुलींनी या वधुवर परिचय मेळाव्यामध्ये दि. १५ एप्रिल २०२३ पर्यंत संपर्क मो. ८०८७७०३४१६ व ९८९०३७३२९५ या नंबरवर फोन करून आपली नावनोंदणी करावी.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, यातून समस्त समाज बांधव एकत्रीकरण व्हावे व समाजाचे असणारे प्रश्न या व्यासपीठावर मांडता येतील. एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व स्तरातून उदंड अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. वेळ, पैसा व श्रमाची बचत व्हावी, एकाच व्यासपीठावर पाहणी करून मुलामुलींची निवड करता यावी, यासाठी वधुवर परिचय मेळाव्याची गरज आहे. तसेच परिचय पुस्तिकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng