Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्या

नातेपुते मंडळमध्ये सामाजीक समावेशन उपक्रमाचे आयोजन.

नातेपुते (बारामती झटका)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात मंडळ कृषि अधिकारी नातेपुते अधिनस्त २६ गावांमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता – १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवडामध्ये प्रत्येक गावातील वंचीत, आर्थिक दृष्ट्या कमकुवत, समाजापासून आलिप्त सोशल मिडीयापासून दूर असलेल्या अनुसुचित जाती अनुसुचित जमाती आदिवासी प्रवर्गातील शेतकरी बांधव तसेच शेतकरी बांधवांना कृषि विभाग योजना प्रचार, प्रसिद्धी, प्रसार व सहभागासाठी या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते.

कृषि विभागाचा हा उपक्रम पंधरवडा संपल्यानंतरही चालू राहणार असलेबाबत व योजनात समाविष्ट होण्याबाबत श्री. सतिश कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते यांनी केले आहे. या पंचायत पंधरवड्यात या प्रवर्गातील बांधवांना केलेल्या प्रचार, प्रसिद्धी, माहिती, मार्गदर्शन, सल्लामध्ये मौजे कोथळे, लोणंद, पळसमंडळ, पिरळे, गुरसाळे या गावातील बांधवांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोदविला.

या पंधरवड्यात सुक्ष्म सिंचन, यांत्रीकीकरण, फळबाग क्षेत्र विस्तार, शेतीशाळा, ज्वारी, हरभरा पीक प्रात्यक्षिक, क्रॉपसॅप, हॉर्ट सॅप, ऑन फार्म ट्रेनिंग, विविध योजना निविष्ठा, प्रशिक्षण राष्ट्रीय पोषण अंतर्गत भाजीपाला मिनिकिट वाटप प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग इत्यादी योजनात सहभाग नोंदविला. यापुढेही सामाजिक समावेशन उपक्रम चालू राहणार आहे. तरी या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी लाभ व सहभाग घेण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे‌.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button