नातेपुते येथील ऐतिहासिक राजकीय वारसा असणारे देशमुख घराण्यातील मालोजीराजे तथा आबासाहेब देशमुख नातेपुते नगरीचे पहिले उपनगराध्यक्ष बनले – सत्तारभाई नदाफ.
स्वकर्तुत्वावर शिक्षण, कृषी, समाजकारण व राजकारणाचा वारसा आबासाहेब देशमुख यांनी चालू ठेवला.
नातेपुते ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील ऐतिहासिक राजकीय वारसा असणारे देशमुख घराण्यातील मालोजीराजे तथा आबासाहेब देशमुख पहिले उपनगराध्यक्ष बनले.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये व्यापारी व भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठी समजली जाणारी ग्रामपंचायत नातेपुते. या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिले उपनगराध्यक्ष पदी नातेपुते येथील ऐतिहासिक राजकीय वारसा असणारे देशमुख घराण्यातील मालोजीराजे तथा आबासाहेब देशमुख पहिले उपनगराध्यक्ष बनले आहेत. स्वकर्तुत्वावर शिक्षण, कृषी, समाजकारण व राजकारण यामध्ये आबासाहेब देशमुख यांनी घराण्याचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. अशा युवा नेतृत्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष मुस्लिम समाजाचे युवा नेते सत्तारभाई नदाफ यांचेकडून वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा आहेत.
नातेपुते येथील देशमुख परिवार यांच्या घराण्याकडे पूर्वीपासून गावपंचायत, ग्रामपंचायत आणि आता नगरपंचायतीचा राजकीय वारसा आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडाच्यावेळी गावामध्ये निवडणुका न होता गावातील लोक एकत्र येऊन गावचा मुखिया म्हणून नेमणूक केली जात होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत गावाचे प्रमुख पद भोजराव संभाजीराव देशमुख यांनी भूषवलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती झाल्यानंतर ग्रामपंचायती अस्तित्वात आल्यानंतर समाज भूषण मुधोजीराव तथा नानासाहेब देशमुख यांनी नातेपुते नगरीचे सरपंच पद भूषविलेले आहे.
नानासाहेब देशमुख यांचा वसा आणि वारसा पुढे चालवत शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांनी नातेपुते नगरीचे सरपंच पद भूषवून सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषविलेले आहे. अशा राजकीय घराण्यांमध्ये मालोजीराजे यांचा शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख व सौ. सुचित्रादेवी यांच्या पोटी दि. 8/8/1991 साली जन्म झालेला आहे. सौ. सुचित्रादेवी यांचे माहेर चाळीसगाव येथील सूर्यवंशी परिवारातील आहे. सासर आणि माहेर दोन्ही संस्कारित घराणे असल्याने आबासाहेब यांच्यावर लहानपणापासून आई वडील आणि घराण्यातील पूर्वजांचे चांगले संस्कार घडलेले आहेत. पूर्वीपासून घरामध्ये राजकारणाचे बाळकडू मिळालेले होते. परंतु त्यांनी उच्च शिक्षण घेऊन राजकारण आणि समाजकारण दोन्हीचीही सांगड घातलेली आहे.
आबासाहेब यांचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण भारत चिल्ड्रन्स अकॅडमी वालचंदनगर येथे झालेले आहे. अकरावी ते बारावी दाते प्रशाला नातेपुते येथे झालेले आहे. बारामती येथील ॲग्री कॉलेजमध्ये त्यांनी डिग्री 2013 साली पूर्ण केली आहे. एमबीए बालेवाडी पुणे येथे पूर्ण केले आहे. आपल्या कृषी क्षेत्रातील शिक्षणाचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व्हावा यासाठी त्यांनी आपल्या शेतामध्ये द्राक्ष बागेची निर्मिती करून भरघोस असे उत्पन्न घेऊन समाजामध्ये उच्चशिक्षित असणारे सुद्धा उत्कृष्ट शेती करीत असतात याचा आदर्श समाजासमोर ठेवला.
शेतकऱ्यांना मोफत सल्ला व दर्जेदार औषधी बी-बियाणे वाजवी किंमतीमध्ये देण्याकरता रेणुका ऍग्रो नातेपुते येथे सुरू करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीविषयी सल्ला देण्याचे काम सुरू केले. समाजामध्ये जनतेची सेवा करता यावी यासाठी आबासाहेब यांनी समाजभूषण नानासाहेब देशमुख विकास सेवा सोसायटी व्हाईस चेअरमन, रेणुका पतसंस्था, दाते प्रशाला नातेपुते अशा संस्थांवर संचालक पदावर ते कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी आबासाहेब यांनी एस. एन. डी. इंटरनॅशनल स्कूलची निर्मिती केली. सीबीएससी पॅटर्न असणारी ग्रामीण भागातील पहिली शाळा नातेपुते येथे बाबाराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेब यांनी सुरू केलेली आहे.
आबासाहेब यांना समाजभूषण नानासाहेब देशमुख यांचा आदर्श व सौ. सुचित्रादेवी व श्री. बाबाराजे यांचे मार्गदर्शन आणि मोरे परिवारातील धर्मपत्नी सौ. श्रुतिका यांचे सहकार्य लाभत असल्याने आबासाहेब यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे.
नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नातेपुते नगरीचे ज्येष्ठ नेते शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, नातेपुते नगरीचे पोलीस पाटील समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे यांच्या नेतृत्वामध्ये नगरपंचायतमध्ये उपनगराध्यक्ष पदावर काम करण्याची आबासाहेब यांना प्रथम संधी मिळालेली आहे.
उपनगराध्यक्ष मालोजीराजे तथा आबासाहेब देशमुख निश्चितपणे संधीचे सोने करून जनतेच्या अडीअडचणी सोडवून विकास कामाच्या माध्यमातून नातेपुते नगरीचा चेहरा-मोहरा बदलतील असा विश्वास नातेपुतेकरांना आहे.
आबासाहेब यांना उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा लाभो हीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेस बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
ypnjkxeomzugrpyekpdacurliqeghu https://websiteservice360.com/wp-content/cache/gsch.html