नातेपुते येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला धुमधडाक्यात सुरुवात
आमदार चषकाचा १ लाख ११ हजार रुपयांचा मानकरी कोणता संघ ठरणार, अनेकांच्या लागल्या नजरा…
नातेपुते (बारामती झटका)
माळशिरस विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक स्पर्धेचे आयोजन प्रेमभैय्या देवकाते पाटील युवा मंच यांच्यावतीने पालखी मैदान, नातेपुते येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उदघाटन लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते दि. 27/02/2023 रोजी संपन्न होवून स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आमदार चषक 2023 साठी उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर
नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे साहेब, नगरसेवक दीपकआबा काळे, नगरसेवक अमित चांगण, नगरसेवक माऊली उराडे, नगरसेवक शशिकांत बरडकर, नगरसेवक अण्णासाहेब पांढरे, नगरसेवक रणजीत पांढरे, युवा नेते प्रेम भैया देवकाते पाटील, पीएसआय पवार साहेब, गोटमशेठ पांढरे पाटील, देविदास उर्फ भैय्या चांगण, डॉ. नरेंद्र कवितके, राहुलशेठ पद्मन, संजयमामा चांगण, राहुल रुपनवर, पै. सोमा जाधव, भाऊ रायते, संतोषभाऊ देवकाते पाटील, राहुलशेठ रणदिवे, पै. अजित पांढरे पाटील, हनुमंत देवकाते पाटील, अक्षयभैय्या ठोंबरे, डॉ. लवटे, नागेश मेटकरी, नातेपुते स्पोर्ट नातेपुते व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री. प्रेमभैया देवकाते पाटील युवा मंच यांच्यावतीने करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेसाठी नातेपुते स्पोर्ट्स आणि नातेपुते वॉरियर्स ग्रुप यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच ॲड. बी. वाय. राऊत, ज्ञानराज (माऊली) पाटील, अण्णासाहेब पांढरे, माऊली उराडे, धनाजी काळे, बाळासाहेब काळे, यशवंत शिनगारे, सुरेंद्र (भैय्या) सोरटे, जयराज पांढरे, संजय झगडे, एम. बी. सर, शशी होडगे, बापू सरक यांचे देखील विशेष सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस दादासाहेब उराडे यांच्यावतीने 1 लाख 11 हजार रु. आहे. द्वितीय बक्षीस अतुलबापू पाटील यांच्यावतीने 71 हजार रु. आहे, तर तृतीय बक्षीस दीपक काळे व भैय्यासाहेब चांगण यांच्यावतीने 51 हजार रु. तर चतुर्थ बक्षीस राहुलशेठ पद्मन यांच्यावतीने 31 हजार रुपये आहे.
या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीची खास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच क्रिकेटप्रेमींना घरबसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेता यावा यासाठी संपूर्ण स्पर्धा युट्युब वर लाईव्ह पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे निमंत्रक प्रेमभैया देवकाते पाटील, गोटम शेठ पांढरे, राहुलशेठ रणदिवे, अक्षय ठोंबरे, पै. अजित पांढरे हे आहेत.
रविवार दि. 05/03/2023 रोजी सकाळी 10 वा. लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा अभिष्टचिंतन सोहळा, फायनल सामना व बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी या स्पर्धेचा लाभ जास्तीत जास्त क्रिकेटप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read! The author’s perspective was fascinating and left me with a lot to think about. Let’s discuss further. Click on my nickname for more thought-provoking content!