Uncategorizedताज्या बातम्या

नातेपुते नगरीचे जेष्ठ नेते नगरसेवक दादासाहेब उराडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते नगर पंचायतीचे विद्यमान नगरसेवक राजेंद्र ऊर्फ दादासाहेब उराडे यांच्या वाढदिवसानिमित्त दादासाहेब उराडे मित्रपरिवार नातेपुते आणि समस्त ग्रामस्थ नातेपुते यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. १/१२/२०२२ रोजी जिल्हा परिषद शाळा नं.१ येथे नगरसेवक भानुदास राऊत, रवी पोतदार, प्रमोद पद्मन, विनायक सुर्वे, सिद्धू चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येणार आहे.

दि. २/१२/२०२२ रोजी नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात नगरसेवक रावसाहेब पांढरे, सुरेश आण्णा पांढरे, नगरसेवक दीपक काळे, डॉ. नम्रता व्होरा, डॉ. माधव लवटे, डॉ. उदय दोशी आदी मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहेत.

दि. ३/१२/२०२२ रोजी प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेत नगरसेविका सौ मायाताई उराडे, विजय उराडे, सुधाकर राऊत, अमोल पाडसे, कोंडीबा काळे, दिलीप काळे आदी मान्यवरांच्या हस्ते अन्नदान करण्यात येणार आहे.

दि. ४/१२/२०११ रोजी बाळूमामा गोशाळेत नगरसेविका सौ. सविता बरडकर, एन. के. साळवे, विवेकजी राऊत, संभाजी काळे, दत्तू लांडगे, प्रेम देवकाते आदींच्या शुभहस्ते चारा वाटप करण्यात येणार आहे.

दि. ५/१२/२०२२ रोजी भास्कर आण्णा उराडे व्यापारी संकुल व वडार समाज स्मशानभूमी येथे नगरसेविका सौ. शर्मिला चांगण, युवराज वाघमारे, नामदेव पांढरे, राजेंद्र काळे, शंकरराव हिवरकर, सुनील बरडकर, भारत सोरटे आदींच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

तसेच सायंकाळी ६.३० वा. अण्णाभाऊ साठे चौक, दहिगाव रोड, नातेपुते येथे सत्कारमूर्ती राजेंद्र (दादा) उराडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ संपन्न होणार आहे.

तरी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button