नावात दादा मात्र वागण्यात सोज्वळ सुसंस्कृत व शिक्षित असणारे कर्तुत्ववान नेतृत्व म्हणजे दादासाहेब.
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे माळशिरस तालुका अध्यक्ष मोठेवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य दादासाहेब खरात यांच्या 35 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा दूरसंचार समितीचे निमंत्रित सदस्य सोपानकाका नारनवर भाजपा किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व नीरा देवधर संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सरगर, भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजयजी देशमुख, भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष व बैलगाडी शर्यतीचे संघटक युवराज वाघमोडे, दहिगाव गावचे उमलते नेतृत्व उगवता तारा शंभुराजे नारनवर, बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील आदींनी वाढदिवसानिमित्त सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.
नावात दादा मात्र वागण्यात सोज्वळ व सुसंस्कृत आहेत उच्च शिक्षित आहेत स्वकर्तृत्वावर समाजामध्ये कार्यातून आपला वेगळा ठसा निर्माण करणारे कर्तुत्ववान नेतृत्व म्हणजे दादासाहेब खरात आहे.
मोटेवाडी माळशिरस ग्रामपंचायतच्या सरपंच पदी दादासाहेब यांच्या मातोश्री द्वारकाबाई खरात यांनी जनतेची सेवा केलेली आहे दादासाहेब यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या सहकार्यातून गावामध्ये अनेक विकास कामे केलेली आहेत सध्या दादासाहेब ग्रामपंचायत सदस्य आहेत. उंची भरपूर देहयष्टी चांगली असून नावात दादा आहे मात्र वागण्या बोलण्यात साधा असणारा दादासाहेब खरात यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng