Uncategorizedताज्या बातम्या

निरा देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या रखडलेल्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

फलटण (बारामती झटका)

सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या भेडसावणाऱ्या शेती पाण्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून निरा देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरणाकडे बघितले जाते. निरा देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या रखडलेल्या कामाला गती देण्याचे काम लवकरच हाती घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळ गावी आले असता त्यांचे स्वागत माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत प्रदीर्घ चर्चा झाली.

यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सातारा व सोलापूर जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा व शेती पाण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या निरा देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरणाबाबत माहिती घेऊन नीरा देवघरचे रखडलेले व उर्वरित कामास मान्यता देऊ. तसेच कृष्णा भीमा स्थिरीकरणासंदर्भात विधिमंडळाकडून लवकरच या प्रकल्पाची मान्यता घेऊन दोन्हीही महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामास लवकरच सुरुवात करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिला‌.

धोम धरणाचे पुराचे पाणी नदीत सोडून नदीकाठच्या गावातील लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका आणण्याऐवजी त्यातील काही पाणी धोम बलकवडी कॅनॉलमध्ये सोडण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. यासंदर्भात ताबडतोब पाणी धोम धरणातून धोम बलकवडी कॅनॉलमध्ये सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे धोम धरणाचे पुराचे पाणी कॅनॉलमध्ये सोडण्यात येणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button