Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

पंढरपूर येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेजचा फिएस्टा २०२३ उत्साहात संपन्न

पंढरपूर (बारामती झटका)

एमआयटी विश्वशांती गुरुकुल ज्युनिअर कॉलेजचा फिएस्टा २०२३ शनिवार दि. २१ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. पंढरपूर तालुक्यातील व आसपासच्या अनेक शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवून बक्षिसे व ट्रॉफी जिंकल्या. यामध्ये ॲग्रीकल्चर झोन, गेम झोन, सायन्स प्रोजेक्ट झोन, डान्स, वाद्य, गायन इत्यादीमध्ये विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदवला.

यामध्ये विजयी विद्यार्थी व त्यांच्या शाळा खालीलप्रमाणे

  • हेमंत भांगे (सोलो सॉंग – प्रथम क्रमांक, एमआयटी वाखरी)
  • सोहम तोरणे (सोलो सॉंग – द्वितीय क्रमांक, हनुमान विद्यालय, तोंडले)
  • कीर्ती नाईकनवरे (सोलो डान्स – प्रथम क्रमांक, हनुमान विद्यालय, तोंडले)
  • सहारा मोरे (सोलो डान्स – द्वितीय क्रमांक)
  • रेणुका विद्यालय, बाबुळगाव (ग्रुप डान्स – प्रथम क्रमांक)
  • लोटस पब्लिक स्कूल, पंढरपूर( ग्रुप डान्स – द्वितीय क्रमांक)
  • श्री मधुकर भांगे (पालक, गायन)

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमआयटी गुरुकुल चे सीनियर प्रिन्सिपल श्री. अपु डे व ज्युनिअर कॉलेजच्या प्रिन्सिपल सौ. कार्तिश्वरि मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button