Uncategorized

पांढरे इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या नूतनीकरणाचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न होणार…

आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, आ. दत्तात्रय भरणे, आ. राम सातपुते, माजी आ. रामहरी रुपनवर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते ता. माळशिरस येथील पांढरे इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या नूतनीकरणाचे भव्य उद्घाटन शनिवार दि. २२/४/२०२३ रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे मामा, माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते, विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या शुभहस्ते व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव मुधोजीराव देशमुख, नातेपुते नगरीचे माजी पोलीस पाटील राजेंद्रभाऊ हनुमंतराव पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक भानुदास राऊत, नगराध्यक्षा सौ. उत्कर्षाराणी पलंगे, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन रघुनाथ अण्णा कवितके, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य ज्ञानराज पाटील, नातेपुते नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, धुळदेव बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन डी. एन. काळे, नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. एम. पी. मोरे, नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, नातेपुते नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे‌. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे निमंत्रक श्री. दादासाहेब काशिनाथ पांढरे, श्री. राजेंद्र दादासाहेब पांढरे, श्री. विजय दादासाहेब पांढरे यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नातेपुते येथील श्री. दादासाहेब काशिनाथ पांढरे यांचे सर्वसामान्य व शेतकरी व्यवसाय असणारे. यांना राजेंद्र व विजय अशी दोन मुले आहेत. नातेपुते शहराचे व्यापारी दृष्टिकोनातून माळशिरस तालुक्यातच नव्हे तर सोलापूर, सातारा, सांगली, पुणे व इतर जिल्ह्यात नाव आहे. यामुळे राजेंद्र व विजय यांनी शिक्षणापेक्षा उद्योग व्यवसायाकडे लक्ष दिले. व्यवहारज्ञानापुरते शिक्षण घेऊन राजेंद्र व विजय या राम-लक्ष्मणाच्या जोडीने २००२ साली पांढरे इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स दहिगाव रोड नातेपुते येथे व्यवसायास सुरुवात केली. सुरुवातीस टीव्ही, रेडिओ, व्हिसीआर, सिडीकॅसेट अशा वस्तुंसह वायर, बल्ब, पंखे, इस्त्री अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीस सुरुवात केली. दिवसेंदिवस उद्योग व्यवसायामध्ये वाढ होत गेली.

दोन्ही बंधूंनी व्यवसाय करीत असताना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून व्यवसाय केला‌‌. अगोदरच व्यापार क्षेत्रामध्ये नातेपुते गावाचे नाव होते. पांढरे इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाने स्वतःच्या नावाची वेगळी ओळख निर्माण करून नातेपुते नगरीच्या उद्योग व्यवसायाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नातेपुते येथील पांढरे इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची नेहमी वर्दळ असते. मालाची गॅरंटी आणि किंमत या दोन्हीचा ताळमेळ ठेवलेला आहे. नफा कमी मात्र, विक्री ज्यादा हे सूत्र अवलंबलेले असल्याने दिवसेंदिवस व्यवसाय वाढत गेला. उद्योग व्यवसायामध्ये वडिलांच्या आशीर्वादाने राजेंद्र आणि विजय या राम लक्ष्मणाच्या जोडीने आपली स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. पूर्वीच्या व्यवसायापेक्षा कितीतरी पटीने व्यवसाय वाढलेला असल्याने ग्राहकांना खरेदी करताना अडचण येऊ नये यासाठी दोन दशकानंतर दुकानाचे नूतनीकरण करून भव्य शोरूमसारखे दुकान उभारलेले आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा अक्षय तृतीया या दिवशी दुकानाचे नूतनीकरणाचा शुभारंभ होत आहे. नजरचुकीने आपणांस निमंत्रण हस्ते परहस्ते, नजरचुकीने देण्याचे विसरून गेले असेल तरी मित्रपरिवार, नातेवाईक, ग्राहक व हितचिंतक यांनी उपस्थित रहावे, असे पांढरे परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे. पांढरे परिवार यांच्या भव्य उद्घाटन समारंभास बारामती झटका परिवार संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचे कडून लाख लाख शुभेच्छा आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button