पिंपरी ग्रामपंचायतीच्यावतीने ना. रामदासजी आठवले यांच्याकडे २५ लाख दलीतवस्ती विकास निधीची मागणी

पंढरपूर (बारामती झटका)
केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री भारत सरकार ना. रामदासजी आठवले साहेब यांनी आज पंढरपुर दौऱ्यावर असताना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संर्पक कार्यालयाला भेट दिली. यावेळी मौजे पिंपरी ग्रामपंचायतीच्यावतीने लेखी पत्र देऊन दलीत वस्ती सुधारणासाठी २५ लाख रु. निधीची मागणी करण्यात आली, सदर गामपंचायतचे पत्र व ठराव पिंपरीचे मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी दिलीप धोत्रे यांच्या समवेत मंत्री महोदयाना दिले. याला मंत्री महोदयांनी लवकरच निधी देण्याचे मान्य केले आहे.
सदर पत्रात असे नमूद करण्यात आले आहे कि, मौजे पिंपरी येथील अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये दत्तनगर ते आवळेवस्ती रस्ता करणे ८ लाख रु., आवळेवस्ती येथे जिम उभा करणे ५ लाख रु., वाल्मीक नारायण झेंडे वस्ती येथे पाणीपुरवठासाठी टाकी बांधणे ४ लाख रु., आवळेवस्ती ते कर्चेवाडी पथदिवे उभारणे ५ लाख रु., अशी विकास कामे मंजूर व्हावीत, अशी मागणी सदर पत्रात करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng