पिसेवाडीत जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शिवजयंतीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप
पिसेवाडी (बारामती झटका)
पिसेवाडी ता. माळशिरस गावांतील भाकरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोषणा देवून जयजयकार करण्यात आला.
यावेळी अमोल लालासो भाकरे, संजय भाकरे, विजय भाकरे, शालेय समितीचे अध्यक्ष्य दादासो भाकरे, ग्रामपंचायत सदस्य साहील आतार, शैलेश भाकरे, रामभाऊ भाकरे, आबा जाधव, शुभम मोरे, तुषार भोसले, विशाल पोरे, सुरेश मोरे, प्रविण सावंत आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि जल्लोष ओसंडून वाहत होता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng