Uncategorizedताज्या बातम्या
पिसेवाडी येथे वाघजाई यात्रा महोत्सवाचे भव्य आयोजन
पिसेवाडी (बारामती झटका)
पिसेवाडी ता. माळशिरस या गावचे ग्रामदैवत वाघजाई देवीच्या भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन जय वाघजाई गजीढोल संघ यांच्यावतीने जय वाघजाई मंदिर येथे करण्यात आले आहे.
शनिवार दि. ३/६/२०२३ रोजी सकाळी ९ वाजता देवीची महापूजा, दिवसभर वटपौर्णिमा, देवीची यात्रा, आणि सायंकाळी ८ ते ११ ऑर्केस्ट्रा अशा कार्यक्रमाचे आयोजन असणार आहे.

तसेच रविवार दि. ४/६/२०२३ रोजी सकाळी ९ ते ५ गजीढोल महोत्सव कार्यक्रम, दुपारी २ ते ५ महाप्रसाद असणार आहे.
तरी पिसेवाडी व पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या यात्रा महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.