ताज्या बातम्याशहर

पुणे पंढरपूर रोड निमगाव पाटी जवळ अकलूज कडे जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात झाला..


विझोरी ( बारामती झटका )

श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर माळशिरस तालुक्यातील निमगाव पाटी जवळ अकलूज रस्त्यावर चार चाकी व मोटरसायकल यांचा भीषण अपघात होऊन मोटरसायकल वरील दोन्ही व्यक्तींचे पायाला मोठ्या प्रमाणात लागलेले असून जोराची धडक बसल्यानंतर चार चाकी चालकाचा ताबा सुटलेला असून गाडी विरुद्ध दिशेला जाऊन अकलूज दिशादर्शक असणाऱ्या लोखंडी फलकावर जाऊन गाडी रस्त्याच्या कडेला साईट पट्टीवर उभी राहिलेली आहे.


विठ्ठलवाडी येथील तीन मोटरसायकल वरून अकलूज कडे लोक निघालेले होते निमगाव पाटी पास करून अकलूज कडे वळणार होते त्यापैकी एक नंबर गाडी अकलूज कडे वळालेली होती दुसऱ्या नंबरची मोटर सायकल वळत असताना पंढरपूरकडून येणाऱ्या चार चाकी गाडीचा आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला त्यांच्याच पैकी पाठीमागे असणाऱ्या मोटरसायकल वरील लोकांच्या व आसपासच्या लोकांना भीषण अपघात डोळ्यासमोर होताना पाहायला मिळाला.

मोटर सायकल जिथून अकलूज कडे वळणार होती त्याच ठिकाणी चार चाकी गाडीची जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल वरील दोन व्यक्ती व मोटरसायकल रस्त्यावर पडली तर धडकेनंतर चार चाकी गाडी दुसऱ्या बाजूकडे जाऊन अकलूज दिशादर्शक फलकाला धडकलेली आहे मोटरसायकल अपघात व्यक्ती जबरदस्त धक्का असल्याने बेशुद्ध अवस्थेत होत्या अपघात व्यक्तींचे नातेवाईक उपस्थित असल्याने अकलूज येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी घेऊन गेलेले आहेत.


पुणे पंढरपूर पालखी महामार्ग झाल्यानंतर अनेक ठिकाणी रस्ते मृत्यूचे सापळे बनलेले आहेत त्यापैकी निमगाव पाटी जवळील अकलूज कडे वळणारा रस्ता मृत्यूचा सापळा करत आहे पंढरपूर कडून पुणे कडे जाणारे वाहन येत असताना वेगाची मर्यादा वाढलेली असते अकलूज कडे वळणाऱ्या मोटरसायकल व इतर वाहनांचे पंढरपूर कडून येणाऱ्या वाहनांना वळणार आहेत की नाही याची कल्पना नसते त्यामुळे अचानक वाहन वळाल्यानंतर जोरात येणाऱ्या वाहनांची कसरत होते काही वेळेला अपघाताला सामोरे जावे लागते यासाठी महामार्गावरील अधिकारी यांनी वेळीच उपाय करावे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.

अपघात घडलेली घटना विझोरी हद्दीमध्ये घडलेली आहे निमगाव पाटी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संपर्क कार्यालय आहे अपघाताची खबर मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आंदोलन वीर अजित भैया बोरकर यांनी घटनेच्या ठिकाणी जाऊन अपघातग्रस्त लोकांची विचारपूस करून नातेवाईकांना दवाखान्यात घेऊन जाण्याकरता मदत केली अपघाताचे मूळ कारण पाहता असे अपघात वारंवार घडू नये यासाठी तात्काळ महामार्गाचे प्रकल्प संचालक घोडके यांच्याशी संपर्क साधून घटनेची संपूर्ण माहिती दिली तात्काळ अपघात होण्याची कारणे शोधून तात्काळ उपायोजना कराव्या अन्यथा आंदोलन केले जाईल अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित भैया बोरकर यांनी दिलेला आहे.

Related Articles

5,376 Comments

  1. Best Automatic Folding Mobility Scooter Uk Tools To
    Improve Your Daily Lifethe One Best Automatic Folding Mobility Scooter
    Uk Trick Every Individual Should Be Able To best automatic folding mobility scooter uk (Bella)

  2. An experienced mesothelioma law firm has the expertise and resources to help victims receive compensation. Compensation may come from a variety
    of sources, including VA benefits as well as Asbestos law Trust Funds and
    personal injury lawsuits.