Uncategorized

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सशक्त नारी समृद्धी कार्यक्रमात महिला “जागर” मध्ये पुरुषांचा “गोंधळ”

माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत माळशिरस पंचायत समिती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीरात महिला नाराज…

माळशिरस (बारामती झटका)

महिला व बालकल्याण विभागाने माळशिरस पंचायत समिती येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा सभागृहात माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सशक्त नारी समृद्ध नारी कार्यक्रमात महिला जागर मध्ये पुरुषांचा गोंधळ, असा प्रकार झालेला असल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिरात महिला भगिनींमधून नाराजीचा सूर उमटलेला आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या आदेशाने महाराष्ट्रामध्ये महिला व बाल विकास प्रकल्प अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिर घेण्याच्या सूचना आहेत. त्यामध्ये सशक्त नारी समृद्ध नारी अशा प्रकारे कार्यक्रम घेऊन महिलांमध्ये ज्या समस्या असतील त्याची सोडून चर्चा असा शासनाचा उद्देश आहे. मात्र, माळशिरस पंचायत समितीमध्ये महिला व बाल विकास प्रकल्प अंतर्गत घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये महिलांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटलेला आहे.

शासनाचे धोरण चांगले आहे मात्र, माळशिरस येथे धोरणाचा अवलंब करीत असताना मूळ उद्देश महिलांचा बाजूला राहिला. पुरुष मंडळींनी व्यासपीठावर गोंधळ उडविला. लोकप्रतिनिधी त्यामध्ये खासदार, आमदार व अधिकारी व्यासपीठावर असायला हवे होते. मात्र मोकारांची गर्दी पाहावयास मिळाली. त्यामुळे समस्या लोकप्रतिनिधींच्या समोर मांडता आलेल्या नाहीत. राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या समोर हा सर्व प्रकार सुरू होता.

लोकप्रतिनिधी म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते पुणे येथील पालखीच्या बैठकीस गेलेले होते. सशक्त नारी समृद्ध नारी या कार्यक्रमात व्यासपीठावर सुरू असलेला राजकीय कलगीतुरा पाहावयास मिळालेला आहे “डायसवरील माईक अचानक गायब झाला”, असे अनेक किस्से उपस्थित महिलांनी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना कार्यक्रम संपवून घरी परत जात असताना टमटम उभा करून व चौकामध्ये वाहनांची वाट पाहत बसलेल्या महिलांनी कैफियत सांगून प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे. उन्हाचा तडाखा असताना सुद्धा आम्ही कार्यक्रमाला आलो होतो. एका महिलेने आवर्जून सांगितले व्यासपीठावरील उपस्थितांचे फोटो आपण सोशल मीडियावर व्हायरल करावे म्हणजे “हा कसा”, “तो कसा” व्यासपीठावर बसलेला आहे याची सर्व सामान्य जनता व सुज्ञ नागरिक चर्चा करेल, असाही सल्ला महिलेने दिलेला आहे. सशक्त नारी समृद्ध नारी कार्यक्रमात महिलांची जनजागृती होऊन जागर होणे गरजेचे होते मात्र, व्यासपीठावरील मोकार पुरुषांचा कार्यक्रमांमध्ये काय संबंध, असा सवाल उपस्थित करून पुरुषांचा गोंधळ पहावयास मिळालेला आहे. कार्यक्रमास बारामती झटका प्रतिनिधी कोणीही नसल्याने सविस्तर माहिती घेऊन झालेला प्रकार जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort